Sukanya Samriddhi Yojana मध्ये घरबसल्या जमा करा दरमहा २५० रूपये; मिळणार मोठा परतावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 03:57 PM2021-05-05T15:57:12+5:302021-05-05T16:02:43+5:30

मुलींच्या भविष्यासाठी तरतूद म्हणून सरकारद्वारे ही स्कीम सुरू करण्यात आली आहे.

आजही भारतात मुलांचं शिक्षण आणि त्यांच्या लग्नावर आई-वडिल अधिक खर्च करताना दिसतात.

म्हणून बहुतांश पालकांचा कल हा अशा गुंतवणूकीत असतो ज्यातून अधिक परतावा मिळेल.

केंद्र सरकारची सुकन्या समृद्धी योजना ही अशीच एक लोकप्रिय योजना आहे. ही योजना मुलींच्या भविष्याकडे पाहून सुरू करण्यात आली आहे.

सुकन्या समृद्धी योजनेत आपल्याला ७.६ टक्क्यांचं व्याज मिळतं.

जर पीपीएफ किंवा सुकन्या समृद्धी योजना यापैकी कोणतीही एखादी योजना निवडायची असेल तर तुम्ही सुकन्या समृद्धी योजना निवडू शकता.

कारण पीपीएफच्या तुलनेत यात अधिक परतावा मिळतो. जर तुम्ही पीपीएफमध्ये १५ वर्षांसाठी गुंतवणूक करता तर त्यातून तुम्हाला चांगला पर्याय मिळू शकतो.

सुकन्या समृद्धी योजनेची मॅच्युरिटी २१ वर्षांची आहे. परंतु या पालकांना केवळ १४ वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते.

या योजनेमध्ये वर्षाला कमीतकमी २५० रूपये आणि जास्तीतजास्त दीड लाख रूपये गुंतवता येतात.

आता तुम्हाला या योजनेचे पैसे घसबसल्याही भरता येण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

जर तुम्ही पोस्ट ऑफिसातून हे अकाऊंट काढलं असेल तर दर महिन्याला तुम्हाला यात ऑनलाइन पैसे जमा करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

यासाठी तुम्हाला आपल्या खात्यातून IPPB (India Post Payment Bank) खात्यात पैसे जमा करावे लागतील.

त्यानंतर DOP Products वर जाऊन तुम्हाला सुकन्या समृद्धी खातं दिसेल. तो पर्याय तुम्ही निवडा.

त्यानंतर SSY अकाऊंट नंबर आणि DOP कस्टमर आयडी टाका. यानंतर सामान्य प्रोसेस पूर्ण करा आणि त्याचा हप्ताचा कालावधी आणि रक्कम निवडा.

त्यानंतर प्रोसेस पूर्ण केल्यावर तुमच्या खात्यातील रक्कम कापली जाईल.

याशिवाय IPPB (India Post Payment Bank) बँकेचं अॅपही उपलब्ध असून त्याच्या माध्यमातून तुम्हाला तुमचा खाते क्रमांक लिंक करता येईल.