टाटांशी पंगा घेतलेला! सायरस मिस्त्रींची कंपनी कर्जात बुडाली; युरेका फोर्ब्स विकावी लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 10:28 AM2021-09-20T10:28:00+5:302021-09-20T10:40:01+5:30

Cyrus Mistry Eureka Forbes news: पालोंजी ग्रुपने फोर्ब्स अँड कंपनी टाटांकडून 20 वर्षांपूर्वी खरेदी केली होती. युरेका फोर्ब्सचे 35 देशांमध्ये 2 कोटींहून अधिक ग्राहक आहेत. 2021 मध्ये या कंपनीला 78 कोटींचे नुकसान झाले होते.

नवी दिल्ली : शापूरजी पालोंजी ग्रुप (Shapoorji Pallonji Group) ची कंझ्युमर ड्युरेबल फ्लॅगशिप कंपनी युरेका फोर्ब्स (Eureka Forbes) कर्जाच्या गर्तेत बुडाली आहे. यामुळे टाटा ग्रुपशी पंगा घेणाऱ्या सायरस मिस्त्रींना ही कंपनी विकावी लागणार आहे. (Advent acquires Eureka Forbes for ₹4,400 crore.)

प्राइवेट इक्विटी ग्रुप एडवेंट इंटरनॅशनल (Advent International) ही कंपनी खरेदी करण्यासाठी तयार झाला आहे. या व्यवहारासाठी एंटरप्राईज व्हॅल्यू 4400 कोटी रुपये ठरविण्यात आली आहे.

युरेका फोर्ब्स ही कंपनी सर्वांना ज्ञात आहे. व्हॅक्यूम क्लिनर, वॉटर प्युरिफायर आदी उत्पादने ही कंपनी बनविते. या कंपनीची विक्री करून 154 वर्षे जुन्या एसपी ग्रुपला आपले कर्ज कमी करून मूळ व्य़वसायावर फोकस करण्यासाठी मदत मिळणार आहे.

एसपी ग्रुपचा मुख्य व्यवसाय हा कंन्स्ट्रक्शन आणि रिअल इस्टेटचा आहे. युरेका फोर्ब्स नुकसानीत आहे. या कंपनीला लिस्टेड पॅरेंट कंपनी फोर्ब्स अँड कंपनी (Forbes & Co.) पासून वेगळे केले जाणार आहे.

एनसीएलटीची परवानगी मिळाल्यानंतर बीएसईवर लिस्ट केले जाईल. लिस्टिंग होताच एडवेंट कंपनी यामध्ये 72.56 टक्के हिस्सा खरेदी करेल. यानंतर नियमानुसार एडवेंट एक ऑफर आणेल.

टाटा ग्रुपची होल़्डिंग कंपनी टाटा सन्स (Tata Sons) मध्ये शापुरजी पालोनजी ग्रुपची 18 टक्के हिस्सेदारी आहे. परंतू आता या कंपनीवर 20000 कोटींचे कर्ज आहे.

सायरस मिस्त्री यांना टाटाची धुरा देण्यात आली होती. परंतू नंतर झालेल्या वादामुळे रतन टाटांनी त्यांना अध्यक्षपदावरून काडून टाकले होते. यामुळे मिस्त्री न्यायालयात गेले होते. परंतू न्यायालयाने देखील मिस्त्री यांच्याविरोधात निकाल दिला होता.

पालोंजी ग्रुपने फोर्ब्स अँड कंपनी टाटांकडून 20 वर्षांपूर्वी खरेदी केली होती. युरेका फोर्ब्सचे 35 देशांमध्ये 2 कोटींहून अधिक ग्राहक आहेत. 2021 मध्ये या कंपनीला 78 कोटींचे नुकसान झाले होते.