कोरोना व्हायरसवरील टॅब्लेट बनवणाऱ्या कंपनीला बक्कळ नफा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 03:29 PM2020-06-27T15:29:23+5:302020-06-27T15:42:11+5:30

कोरोना व्हायरसवर औषध बनविणाऱ्या ग्लेन मार्क फार्मास्युटीकल कंपनीला कोट्यवधींचा फायदा झाला आहे. 31 मार्च 2020 रोजी समाप्त झालेल्या चौथ्या तिमाहीत कंपनीला 220.30 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे.

गेल्यावर्षीच्या 161.66 कोटींच्या तिमाहीच्या नफ्याच्या तुलनेत हा 36.28 टक्के नफा असल्याचं कंपनीनं सांगितलंय. कंपनीने शेअर बाजारात माहिती देताना सांगितले की, कंपनीच्या एकूण भागभांडवलात 7.96 टक्क्यांनी वाढ होऊन ते 2767.48 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे.

संपूर्ण आर्थिक वर्षाच्या आधारावर, 2019-20 मध्ये कंपनीने 2018-19 च्या 924.99 कोटी रुपयांच्या तुलनेत 775.97 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे.

याचमुळे कंपनीच्या भागभांडवलातील 9865.46 कोटी रुपयांमध्ये वाढ होऊन ते 10,646.96 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

ग्लेनमार्क कंपनीचे चेअरमन आणि कार्यकारी संचालक ग्लेन सल्हादा यांनी म्हटले की, कोविड 19 महामारीच्या संकटात जागतिक बाजारातील स्पर्धेतही आमच्या कंपनीने चांगली आगेकूच केली आहे.

कंपनीच्या निर्देशक मंडळाने 2019-20 मध्ये आपल्या शेअरधारकांना एक रुपये किंमत असलेल्या प्रत्येक शेअरवर 2.50 रुपये म्हणजे अडीचशे टक्क्यांच्या वाढीचा लाभांश देण्याची शिफारीश केली आहे.

ग्लेनमार्क फार्मासिटीक्युलने कोविड 19 च्या महामारीत पीडित रुग्णांसाठी एंटीव्हायरल औषध फेविपिराविर यास फॅबी फ्लू नावाचे बाजारात आणले.

या औषधाची म्हणजे एका गोळीची किंमत 103 रुपये प्रिती गोळी ठेवण्यात आली असून 200 एमजीमध्ये हे गोळी उपलब्ध असणार आहे. फॅबी फ्लू औषधाच्या 34 गोळ्यांच्या पाकिटाची किंमत 3500 रुपये एवढी आहे.

कोविड 19 च्या उपचारासाठी फॅबी फ्लू ही फेविफिरवर औषध असून त्यास मंजुरी देण्यात आली आहे.

डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर 103 रुपये प्रति गोळी याप्रमाणे मेडिकल दुकानातून ही गोळी विकत घेता येईल. पहिल्या दिवशी या गोळीच्या 1800 एमजीच्या दोनदा डोस घ्यावा लागणार आहे. त्यानंतर, 14 दिवस 800 एमजीचा दिवसातून दोनदा डोस घ्यावा लागेल.