ATM मधून पैसे काढण्याची पद्धत बदलली, आपल्या फायद्यासाठी RBI नं लागू केला नवा नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 02:33 PM2022-05-20T14:33:16+5:302022-05-20T14:38:55+5:30

RBI Cardless Withdrawals Rule: याचा फायदा म्हणजे, कार्ड क्लोनिंग, कार्ड स्किमिंग आणि इतर बँक फ्रॉड कमी होतील...

ड‍िजिटल ट्रांझेंक्‍शनच्या काळात एटीएममधून कॅश काढणाऱ्यांची संख्या बरीच कमी झाली आहे. मात्र, आपण एटीएममधून पैसे काढत असाल तर ही बातमी आपल्यासाठी अत्यंत उपयोगाची आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) एटीएममधून कार्डलेस विथड्रॉलसाठी (Cardless withdrawal from ATM) बँका आणि एटीएम ऑपरेटर्सना आदेश दिले आहेत.

पूर्णपणे बदलून जाणार कॅश काढण्याची पद्धत - आरबीआयचा हा नियम लागू झाल्यानंतर एटीएममधून पैसे काढण्याची पद्धत पूर्णपणे बदलेल. याचा फायदा म्हणजे, कार्ड क्लोनिंग, कार्ड स्किमिंग आणि इतर बँक फ्रॉड कमी होतील.

कार्डलेस ट्रांझेक्शनमध्ये पैसे काढण्यासाठी आपल्याला डेबिट अथवा क्रेडिट कार्डची गरज भासणार नाही. यासाठी आपण पेटीएम, गुगल पे, अॅमेझॉन पे किंवा फोनपे सारख्या UPI पेमेंट अॅप्सद्वारेच एटीएममधून पैसे काढू शकाल.

NPCI ला UPI इंटिग्रेशनची सूचना - र‍िझर्व्ह बँकेकडून लागू नियमांतर्गत कुठल्ही बँक आपल्या खातेदाराला ही सुविधा देऊ शकते. यासाठी NPCI ला UPI इंटिग्रेशनच्या सूचना आल्या आहेत.

चार्जेसमध्ये कसल्याही प्रकारचा बदल नाही - महत्वाचे म्हणजे, ATM कार्डला सध्या जो चार्ज लागतो, बदलानंतरही तोच चार्ज कायम राहील. यात कुठल्याही प्रकारचा बदल केला जाणार नाही. याशिवाय कॅशलेस ट्रांझेक्‍शनसाठीची मर्यादाही पूर्वीप्रमाणेच राहील.

कशा प्रकारे काम करते ही सुविधा - सध्या कार्डलेस ट्रांझेक्‍शनची सुविधा काही बँकांच्या एटीएमवरच सुरू झाली आहे. नव्या स‍िस्‍टिमनुसार, ग्राहकांना एटीएममध्ये डेब‍िट कार्ड टाकण्याची आवश्यकता राहणार नाही. यासाठी ग्राहकांना एटीएमवर क्‍यूआर कोड स्‍कॅन करावा लागेल. यानंतर 6 ड‍िज‍िटचा यूपीआय एंटर करावा लागेल, मग पैसे येतील.

असा आहे RBI चा उद्देश - कार्डलेस कॅश व‍िथड्रॉल स‍िस्‍टम करण्यामागे, आरबीआयचा उद्देश सातत्याने वाढत चाललेल्या फ्रॉडच्या घटनांना आळा घालणे आहे. यामुळे कार्ड क्‍लोन‍िंग, कार्ड स्किमिंग आणि दुसरे बँक फ्रॉड कमी होतील, अशी आशा आहे. याच बरोबर आपल्याला पैसे काढण्यासाठी कार्डची गरजही राहणार नाही.