'या' वनस्पतीची लागवड करा, लाखो रुपयांची होईल कमाई, 30 टक्के मिळेल अनुदान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 01:45 PM2021-10-23T13:45:57+5:302021-10-23T14:29:59+5:30

Business Idea : हा व्यवसाय शेतीशी निगडीत आहे. या व्यवसायातून तुम्ही मोठा नफा कमवू (Earn Money) शकता.

सध्याच्या काळात प्रत्येकाला व्यवसाय (how to start own business)करायचा आहे, पण पैशाच्या अभावामुळे किंवा योग्य व्यवसाय निवडण्यास सक्षम नसल्यामुळे त्याला तो सुरू करता येत नाही. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी नवीन व्यवसायासंदर्भात आयडिया (Business Idea) देत आहोत.

हा व्यवसाय शेतीशी निगडीत आहे. या व्यवसायातून तुम्ही मोठा नफा कमवू (Earn Money) शकता. अलीकडच्या काळात पारंपारिक शेतमालाशिवाय आरोग्याच्यादृष्टीने अचानक महत्व प्राप्त झालेल्या पिकांची आणि उत्पादनांची मागणीही वाढली आहे. यामध्ये कमी खर्च असून बराच काळ पैसे मिळविणे देखील सुनिश्चित आहे.

हा व्यवसाय तमालपत्राचा आहे, तमालपत्राची लागवड तुम्ही सहज करू शकता, याला इंग्रजीत 'बे लीफ' म्हणतात. तमालपत्राची लागवड हा देखील आपल्या देशात एक फायदेशीर व्यवसाय आहे. हे एक प्रकारचे कोरडे आणि सुवासिक पान आहे.

अन्नपदार्थ चविष्ट बनविण्यासाठी मसाला म्हणून मालपत्राचा वापर केला जातो. अनेक वर्षांपासून याचे उत्पादन घेतले जात आहे. भारतासह रशिया, मध्य अमेरिका, इटली, फ्रान्स आणि उत्तर अमेरिका आणि बेल्जियममध्ये तमालपत्राचे मोठ्याप्रमाणावर उत्पादन घेतले जाते.

तुम्ही तमालपत्राची लागवड सहजपणे सुरू करू शकता. ही शेती करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीच्या टप्प्यात थोडी मेहनत घ्यावी लागेल. जसजसे त्याची झाडे वाढतात तसतसे तुम्हाला कमी काम करावे लागेल. जेव्हा झाड झाडाचा आकार घेईल, तेव्हाच तुम्हाला झाडाची काळजी घ्यावी लागेल. याच्या लागवडीतून तुम्हाला दरवर्षी चांगले उत्पन्न मिळू शकते.

राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाकडून लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना 30 टक्के अनुदान दिले जाते.

नफ्याबद्दल बोलायचे झाले तर एका तमालपत्राच्या रोपातून तुम्ही वर्षाला 5 हजार रुपये कमवू शकता. दुसरीकडे, जर तुम्ही वर्षाला 25 तमालपत्राची झाडे लावली तर तुम्हाला 75 हजार ते 1 लाख 25 हजार वार्षिक उत्पन्न मिळू शकते.