Borosil Renewables: भन्नाटच! ‘या’ कंपनीने दिले तब्बल १४०० टक्के रिटर्न; गुंतवणूकदार मालामाल, तुम्हीही घेतलेत का शेअर्स?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 01:17 PM2021-10-23T13:17:33+5:302021-10-23T13:23:15+5:30

भारतात सोलर ग्लास बनविणाऱ्या एकमेव कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. पाहा, डिटेल्स...

गेल्या काही महिन्यांपासून शेअर मार्केटमध्ये तेजी कायम दिसून येत असून, विक्रमी घोडदौड सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच अनेकविध क्षेत्रातील कंपन्या एकापाठोपाठ एक IPO सादर करत असून, गुंतवणूकदारांना उत्तमोत्तम संधीही देत आहेत.

कोरोना कालावधीतही अनेक कंपन्यांनी उत्तम रिटर्न्स देऊन गुंतवणूकदारांना मालामाल केले. कोरोना संकटातही अनेक क्षेत्रातील कंपन्यांनी ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली. यातच आता देशातील सर्वांत मोठा Paytm चा IPO येणार आहे.

शेअर बाजारात गुंतवणूक करून पैसे कमवावेत, असं कुणाला वाटणार नाही. या पार्श्वभूमीवर भारतात सोलर ग्लास बनविणाऱ्या एकमेव कंपनी बोरोसिल रिन्यूएबल्सने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.

सरकारने नुकत्याच केलेल्या सुधारणा आणि देशातील वीज संकटामुळे या कंपनीचे शेअर्स वाढत आहेत. इक्विटी गुंतवणूकदार आता पारंपारिक ऊर्जेला पर्यायी ऊर्जा स्रोतांसह बदलण्याचे काम करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करू पाहत आहेत.

एप्रिल २०२० महिन्यात बोरोसिल रिन्यूएबल्सचे शेअर्स ३३.६ रुपयांच्या पातळीवरून १४०० टक्क्यांनी वाढले असून आता ५०९.७० वर पोहोचले आहेत. गेल्या दोन ट्रेडिंग सत्रांमध्ये बोरोसिलच्या शेअर्सला लोअर सर्किट लागले होते.

स्वस्त आयातीमुळे देशात अक्षय ऊर्जा उपकरणे बनवणाऱ्या कंपन्यांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळेच देशांतर्गत कंपन्यांना प्रचंड तोटा सहन करावा लागतो. अशा समभागांमध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, असे सांगितले जात आहे.

बोरोसिलच्या शेअर्सने गेल्या १ वर्षात ३३३ टक्के परतावा दिला आहे. इक्विटी ९९ चे सह-संस्थापक राहुल शर्मा म्हणाले की, बोरोसिलने आपला व्यवसाय वाढवण्यासाठी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून २०० कोटी उभारले आहेत.

कंपनीला आपली सोलर ग्लास उत्पादन क्षमता ४५० टन प्रतिदिन वरून ९५५ टन प्रतिदिन करायची आहे. बोरोसिलचे शेअर्स वाढण्याची अपेक्षा आहे, असे सांगितले जात आहे.

दरम्यान, डिजिटल वित्तीय सेवा कंपनी Paytm ला बाजार नियामक सेबीकडून १६,६०० कोटी रुपयांच्या IPO ला मंजुरी मिळाली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावर Paytm आपला IPO शेअर मार्केटमध्ये सादर करेल, असे सांगितले जात आहे.

Paytm आयपीओ यशस्वी झाला, तर तो आतापर्यंतचा देशातील सर्वांत मोठा IPO असेल. आतापर्यंत हा विक्रम कोल इंडियाच्या नावावर आहे. सन २०१० मध्ये IPO द्वारे १५ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली होती.