नोकरी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; सरकारनं जारी केले नवे नियम, ऐकले नाही तर अप्रायझल अडकणार!

By श्रीकृष्ण अंकुश | Published: October 1, 2020 07:47 PM2020-10-01T19:47:43+5:302020-10-01T19:58:04+5:30

कामगार मंत्रालयने नव्या गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. यासंदर्भात कामगार मंत्रालयाशी संबंधित असलेल्या DGHS अर्थात Directorate General of Health Servicesने कामाच्या सुरक्षित जागेसाठी नव्या गाईडलाइन्स तयार केल्या आहेत.

या गाईडलाईन्समध्ये, सोशल डिस्टंन्सिंग आणि कंपनीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असेल. यात CCTVच्या माध्यमाने कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. या निर्देशांचे पालन न केल्यास अप्रायझल अडकू शकते.

यात खासगी कंपन्यांनाही निर्देश देण्यात आले आहेत, की इंडस्ट्री HR पॉलिसीमध्ये बदल करावा. तसेच सर्व कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा बंधनकारक करण्यात यावा.

कोरोनासाठी कंपन्यांनी विशेष रजा धोरण (Special Leave Policy) तयार करावे. तसेच जवळच्या रुग्णालयांसोबत टाई-अप करावे. कर्मचाऱ्यांनी खासगी वाहनांचा अथवा सायकलचा वापर करावा.

कंपन्यांनी पायऱ्यांच्या वापरास प्रोत्साहन द्यायला हवे. लिफ्टचा वापर केला जात असेल तर, एका वेळी 2 से 4 जणांपेक्षा अधिक लोकांना परवानगी देऊ नये.

जारी करण्यात आलेल्या दिशानिर्देशांमध्ये असेही सांगण्यात आले आहे, की 5 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांचे आई आणि वडील दोघेही नोकरी करत असतील तर त्यांना घरून काम करण्याची परवानगी देण्यात यावी.

65 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्यांना घरूनच काम करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात यावे.

कार्यालयांत मुबलक प्रमाणात हँड सॅनिटायझर (स्पर्श न करता वापरता येईल असे.) आणि थर्मल स्क्रीनिंग आवश्यक असेल.

ज्या कर्मचाऱ्यांना पिक अँड ड्रॉपची सुविधा देण्यात आली आहे, अशांना पिक अँड ड्रॉपदरम्यान, अशा बसेस अथवा इतर कुठलेही वाहन उपलब्ध करून द्यावेत, जे आकाराने मोठे असतील. तसेच, यामध्ये एकूण क्षमतेच्या तुलनेत केवळ 30 ते 40 टक्के कर्मचारीच बसवण्यात यावेत. संपूर्ण बस भरू नये.