टेलिकॉम क्षेत्रातही नवी 'आघाडी'?; एअरटेलचे अध्यक्ष व्होडाफोन, जिओला फोन करतात तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 06:07 PM2021-09-17T18:07:34+5:302021-09-17T18:14:54+5:30

Airtel चे अध्यक्ष सुनील मित्तल दूरसंचार क्षेत्राला उभारी देण्यासाठी अन्य कंपन्यांशी चर्चा करत आहेत. त्यांनी व्होडाफोनच्या मुख्य कार्यकारी अधिकारींशीही केली चर्चा.

भारती एअरटेलचे (Bharati Airtel) अध्यक्ष सुनील मित्तल यांनी संकटाचा सामना करणाऱ्या टेलिकॉम क्षेत्राला (Telecom Industry) पुन्हा उभारी देण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. तर दुसरीकडे उद्योग पुनर्बांधणीसाठी आणि फायबर तसंच डेटा सेंटरसारख्या पायाभूत सुविधा सामायिक करण्यासाठी ते इतर कंपन्यांशी चर्चा करत आहेत.

मित्तल यांनी वोडाफोन ग्रुप पीएलसीचे (Vodafone Group) सीईओ निक रीडशीही संपर्क साधला आहे. तसंच ते रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्याशीदेखील चर्चा करणार आहेत.

सरकारनं नुकतं दूरसंचार क्षेत्रासाठी एक पॅकेज जाहीर केलं आहे. मित्तल यांनी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत करत याची मदत होणार असल्याची प्रतिक्रिया दिली. एअरटेल एजीआर आणि स्पेक्ट्रमच्या पैसे देण्याच्या सुविधेत चार वर्षांच्या देण्यात आलेल्या सुट याचा फायदा घेणार असल्याचं म्हटलं.

यामुळे कंपनीच्या कॅश फ्लोमध्ये ३५ हजार ते ४० हजार कोटी रूपयांची बचत होणार आहे. याचा वापर नेटवर्क ऑपरेशन्स मजबूत करण्यास करण्यात येणार असल्याचंही मित्तल यांनी स्पष्ट केलं.

"मी निक रीड यांच्याशी चर्चा केली आहे आणि सरकारनं त्यांचं काम केल्याचंही सांगितलं. आता आपल्याला आपलं काम करायचं आहे," असंही मित्तल यांनी सांगितलं. टॅरिफमध्ये वाढ करण्याबाबत बोलताना मित्तल यांनी काही क्षेत्रांत पुढाकार घेतला जाऊ शकत असल्याचं म्हटलं.

कंपन्या मार्केट शेअरसाठी एकदुसऱ्यांशी स्पर्धा करू शकत नाहीत. त्यांना टिकाऊ व्यवसायाच्या दृष्टीनं प्रयत्न करणं आवश्यक आहे. मी आपलं काम करणार आहे आणि दुसरे त्यांचं काम करतील. कधीपर्यंत असं चालेल. आम्ही कायम सरकारची मदत मागू शकणार नाही, असंही ते म्हणाले.