Multibagger Penny Stock: कवडीचीही किंमत नव्हती पण आज त्याच शेअरमध्ये लाख रुपये गुंतवणारे झालेत कोट्यधीश!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 09:26 AM2022-07-04T09:26:08+5:302022-07-04T09:33:05+5:30

Multibagger Penny Stock: गुंतवणूकदारांना या स्टॉकनं २० हजार टक्क्यांहून अधिक रिटर्न्स दिले आहेत. १९ सप्टेंबर २००३ रोजी या कंपनीचा शेअर बीएसईवर अवघ्या १० पैशांना लिस्ट झाला होता. आजची किंमत पाहून हैराण व्हाल.

शेअर बाजारात गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यानंतर जोरदार विक्री वाढली आहे. यात अनेक गुंतवणूकदार कमालीचे कंगाल झाले. विशेषत: शॉर्ट टर्म मल्टीबॅगर रिटर्नमधून परतावा मिळवण्याची अपेक्षा ठेवणाऱ्यांचा अपेक्षाभंग झाला आहे.

लॉंग टर्मसाठी गुंतवणूक करणारे मात्र फायद्यात आहेत. सीके बिरला ग्रूपची (CK Birla Group) कंपनी असलेल्या ओरिएंट पेपर अँड इंडस्ट्रीचं (Orient Paper and Industries) नाव यापैकीच एक आहे.

ओरिएंट पेपर अँड इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअरनं गेल्या काही वर्षात १० पैसे ते २४.४५ रुपये इथवरची मजल मारली आहे. एक वेळ अशीही आली की कंपनीच्या एका शेअरची किंमत ४० रुपयांपर्यंतही पोहोचली होती.

कंपनीच्या स्टॉकचा ५२ आठवड्याची सर्वाधिक मजल ३९.४० रुपये इतकी आहे. सध्या हा स्टॉक ५२ आठवड्याच्या सर्वात निच्चांकी पातळीवर ट्रेड करत आहे. सध्या याची किंमत १९.८० रुपये इतकी आहे. त्यामुळेच येत्या काळात या स्टॉकमधून मल्टीबॅगर रिटर्न देण्याची क्षमता असल्याचं जाणकार सांगतात.

सध्याच्या परिस्थितीशी तुलना केली असता लक्षात येईल की कंपनीनं आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल २० हजार टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. या कंपनीचा स्टॉक बीएसईवर १९ सप्टेंबर २००३ रोजी अवघ्या १० पैशांसाठी ट्रेड झाला होता.

गेल्या आठवड्यात शुक्रवारी म्हणजेच १ जुलै २०२२ रोजी बीएसईवर याच कंपनीचा शेअर २४.४५ रुपयांवर बंद झाला. याची तुलना करायची झाली तर २००३ साली ज्या गुंतवणूकदारानं या शेअरमध्ये १ लाख रुपये गुंतवले असतील आणि गुंतवणूक आतापर्यंत तशीच ठेवली असेल तर आजच्या घडीला त्याच्या गुंतवणुकीची किंमत २.३० कोटी रुपये झालेली असेल.

कंपनीनं गेल्या १० वर्षांत गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न दिले आहेत. २ ऑगस्ट २००३ रोजी याच्या एका शेअरची किंमत अवघी १.०१ रुपये इतकी होती. याचा अर्थ असा की ९ वर्षात या शेअरनं २ हजार टक्के परतावा दिला आहे.

ऑगस्ट २००३ रोजी कंपनीच्या शेअरमध्ये १ लाख रुपये ज्यानं गुंतवले असतील त्याच्या शेअर्सची किंमत २२.६७ लाख रुपये झाली असती. सध्या या कंपनीची व्हॅल्यू जवळपास ५०० कोटी रुपये इतकी आहे.