Bank Holiday Alert: याच आठवड्यात बँकेची कामे उरकून घ्या; 27 मार्च ते 4 एप्रिल केवळ 2 दिवसच कामकाज होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 08:32 AM2021-03-22T08:32:27+5:302021-03-22T08:40:31+5:30

Banks Will Remain Closed on These Days From March 27 to April 4. Full List Here. बँक कर्मचाऱ्यांनी गेल्याच आठवड्यात सणवार, साप्ताहिक सुटी आणि संपाचे दोन दिवस पकडून मोठा काळ बँका बंद ठेवल्या होत्या. आता पुन्हा संप नसला तरीही बँका जवळपास 8 दिवस बंद असणार आहेत. जाणून घ्या लिस्ट, नाहीतर खोळंबा होईल.

कोरोना काळात सुरु झालेले 2020-21 आर्थिक वर्ष कोरोना काळातच संपत आहे. पहिले सहा महिने जेमतेम गेल्यानंतर पुढील सहा महिन्यात बाजारात काहीसे तेज परतले आहे. (Bank Holiday Alert: As per updates, banks will be closed consecutively for three days from 27-29 March on account of the Second Saturday and Holi festival across India.)

आता हे वर्ष संपायला मोजून 10 दिवस उरले आहेत. जर तुमचे बँकांमध्ये काही महत्वाचे काम असेल, कर्ज हवे असेल, कोणाला पैसे पाठवायचे असतील तर हाच आठवडा तुमच्या हाती आहे.

27 मार्चपासून 4 एप्रिल 2021 पर्यंत केवळ दोम दिवस बँका सुरु राहणार आहेत. म्हणजेच नऊ दिवसांपैकी केवळ दोन दिवस बँका सुरु असतील तर उरलेले सात दिवस बँकांना एकतर सुटी किंवा इयर एन्डींगची कामे असल्याने सामान्य ग्राहकांसाठी बंद असणार आहेत.

संपूर्ण देशभरात महिन्याचा चौथा शनिवार आणि होळीच्या (Holi) सणामुळे 27-29 मार्च असे सलग तीन दिवस बँका बंद (Bank Holiday) असणार आहेत.

27 मार्चला चौथा शनिवार आहे तर 28 मार्चला रविवार असल्याने बँकांना सुटी असणार आहे. या दोन्ही तारखांना देशातील सर्व बँका बंद असणार आहेत. 29 मार्चला होळी असल्याने बँका बंद राहतील. फक्त पटन्यामध्ये बँका सलग 4 दिवस बंद राहणार आहेत.

आरबीआयच्या वेबसाईटनुसार पटनामध्ये 30 मार्चला देखील ग्राहक बँकेत जाऊ शकणार नाहीत. तर 31 मार्चला सुटी नसली तरीही बँक कर्मचारी इयर एन्डीन्गमध्ये व्यस्त असल्याने जवळपास सर्व कामे ठप्प असतात. कर्मचारी ग्राहकांच्या कामाकडे जास्त लक्ष देत नाहीत.

एक एप्रिलला बँकांचा लेखाजोखा असल्याने त्या दिवशीही काम होणार नाही. तर 2 एप्रिलला गुड फ्रायडे असल्याने बँका बंद असतील.

यानंतर तीन एप्रिलला सर्व बँका सुर होतील. परंतू एवढ्या दिवसांची कामे रखडलेली असल्याने गर्दी एवढी असेल की कोरोनामुळे किती वेळ लागेल आणि किती वेळ रांगेत उभे रहावे लागेल याचा विचारच न केलेला बरा.

यानंतर चार एप्रिलला रविवारी असल्याने बँकांना साप्ताहिक सुटी असणार आहे.

म्हणजेच २७ मार्च ते 4 एप्रिल अशा या प्रदीर्घ काळात बँका केवळ दोन दिवस सुरु राहतील. 30 मार्च आणि तीन एप्रिल (शनिवार). या दोन दिवसांतच तुम्हाला घाईघाईत कामे उरकून घ्यावी लागणार आहेत.

बँक कर्मचाऱ्यांनी गेल्याच आठवड्यात सणवार, साप्ताहिक सुटी आणि संपाचे दोन दिवस पकडून मोठा काळ बँका बंद ठेवल्या होत्या. आता पुन्हा संप नसला तरीही बँका जवळपास 8 दिवस बंद असणार आहेत.