Bank Holidays : मार्चमध्ये 11 दिवस बंद राहणार बँका; व्यवहार करण्याआधी जाणून घ्या, कधी आहेत सुट्टया...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 12:09 PM2021-02-24T12:09:53+5:302021-02-24T12:41:50+5:30

Bank Holidays : येत्या मार्च महिन्यात 11 दिवस बँका बंद असतील.

नवी दिल्ली : मार्च महिना हा आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असतो. या महिन्यात साधारणत: बँकांशी संबंधित कामकाजात थोडी वाढ असते. दरम्यान, येत्या मार्च महिन्यात 11 दिवस बँका बंद असतील.

त्यामुळे, अशा परिस्थितीत जर तुम्हाला बँक शाखेत कोणत्याही बँकिंग कामासाठी जावे लागले असेल तर त्या दिवशी बँकेला सुट्टी आहे की नाही, हे माहीत करुन घेणे गरजेचे आहे, नाहीतर उगाच फेरफटका मारण्याची तुमच्यावर वेळ येईल.

आरबीआयच्या (RBI) मार्गदर्शक सूचनांनुसार, देशात कार्यरत बँका रविवार व्यतिरिक्त महिन्याच्या दुसर्‍या आणि चौथ्या शनिवारी बंद असतात.

तसेच, मार्चमध्ये काही अतिरिक्त सुट्ट्या आणि काही प्रादेशिक सण सुद्धा आहेत. या सणांनिमित्तदेशातील काही राज्यांत बँकांना सुट्टी असणार आहे.

5 मार्च : 5 मार्चला Chapchar Kut पडत आहे. या दिवशी Aizawl (आइजोल- मिजोरमची राजधानी) मध्ये सर्व बँका बंद राहतील.

11 मार्च : 11 मार्चला महाशिवरात्री (Mahashivratri) आहे. या दिवशी देशातील अनेक राज्यातील बँकांचे कामकाज बंद असरणार आहे.

13 मार्च : मार्च महिन्यातील दुसरा शनिवार असल्यामुळे बँकांना सुट्टी असेल.

14 मार्च : रविवार असल्यामुळे बँकांची साप्ताहिक सुट्टी असेल.

15 मार्च : 15 मार्चला सोमवारअसूनकाही बँक युनियन्सने संप पुकारला आहे. त्यामुळे बँका बंद राहतील.

21 मार्च : रविवार असल्यामुळे बँकांची साप्ताहिक सुट्टी असेल.

22 मार्च : 22 मार्चला बिहार दिवस आहे. त्यामुळे बिहारमध्ये बँका बंद असतील.

27 मार्च : 27 मार्चला महिन्यातील चौथा शनिवार असल्यामुळे देशभरातील बँका बंद असतील.

28 मार्च : 28 मार्चला रविवार असल्यामुळे बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.

29 आणि 30 मार्च : 29 आणि 30 मार्चला होळीचा सण असल्यामुळे बँकांना सुट्टी असणार आहे.

Read in English