गुड न्यूज! आता Bajaj Pay येतंय; RBI कडून मिळाली मंजुरी

Published: May 7, 2021 01:50 PM2021-05-07T13:50:44+5:302021-05-07T13:55:11+5:30

बजाज फायनान्स प्रीपेड पेमेंट बिझनेसमध्ये पदार्पण असून, Bajaj Pay लवकरच लॉंच करण्यात येणार आहे.

कोरोना संकटाच्या काळात ऑनलाइन आणि डिजिटल पेमेंट्समध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. या क्षेत्रात आता आणखी एका कंपनीची भर पडली असून, भारतीय रिझर्व्ह बँकेने याला मंजुरी दिली आहे.

बजाज फायनान्स कंपनीकडून लवकरच Bajaj Pay लाँच केले जाणार आहे. या माध्यमातून बजाज फायनान्स प्रीपेड पेमेंट बिझनेसमध्ये पदार्पण करीत आहे.

बजाज फायनान्सचे डिजिटल वॉलेट कंज्यूमर NBFC च्या आपल्या डिजिटल फायनान्स वाढवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. कंपनी वेगवेगळ्या स्टेजमध्ये ‘बजाज पे’ सुरू करीत आहे.

बजाज फायनान्ससाठी वॉलेट ठेवण्यासाठी आरबीआयची मंजुरी मिळाली आहे. याचा अर्थ कंपनीला प्रत्येक वर्षी आरबीआयकडून मंजुरी घ्यावी लागणार नाही.

भारतात बिल पे सिस्टम जानेवारीत बजाज पे लाइव्ह करण्यात आले होते. आर्थिक वर्ष २०२१ साठी त्याचे कन्सोलिडेटेड प्रॉफिट आर्थिक वर्ष २०१५ मध्ये ९४८ कोटीहून वाढून ते १३४७ कोटीपर्यंत पोहोचले, असे कंपनीकडून सांगण्यात आले.

पीपीआयच्या मदतीने फंड ट्रान्सफर आणि फायनान्शियल वर्क्स केले जाऊ शकते. याची लिमिट जितकी असेल तितकी व्हॅल्यू पेमेंट इंस्ट्रूमेंटमध्ये असणार आहे.

याशिवाय, स्मार्ट कार्ड, मॅग्नेटिक चिप व्हाउचर, मोबाइल वॉलेट सारखे असू शकते. यात कॅश, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड अन्य दुसऱ्या PPI वरून व्हॅल्यू ट्रांसफर केले जाऊ शकते.

हे पीपीआय तुम्हाला कॅश विड्रॉल किंवा थर्ड पार्टी फंड ट्रान्सफरची परवानगी देत नाही. तुम्ही या सिस्टमचा वापर गुड्स अँड सर्विसेजच्या पेमेंटसाठी करू शकता.

बजाज पे माध्यमातून मल्टीपल मर्चेंट्सला पेमेंट करू शकता. मात्र, रोख काढण्याची यात परवानगी देण्यात आलेली नाही. १० हजार रुपयांपर्यंत पीपीआयसाठी तुम्हाला KYC ची गरज पडणार आहे.

जर १ लाख रुपयांपर्यंत व्यवहार करत असल्यास तुम्हाला KYC ची सर्व प्रक्रिया पूर्ण कराव्या लागणार आहेत. Bajaj Pay मार्केटमध्ये आल्यानंतर युझर्सना पेमेंटसाठी नवीन पर्याय उपलब्ध होणार आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Read in English