Airtel देणार १ रूपयांत सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी; सुरु केला नवा प्लॅटफॉर्म

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 01:40 PM2021-05-14T13:40:52+5:302021-05-14T13:45:53+5:30

Investment In Gold : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारापेक्षा सध्या अनेक जणांचा कल हा सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याकडे आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारापेक्षा सध्या अनेक जणांचा कल हा सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याकडे आहे.

दरम्यान, एअरटेल पेमेंट्स बँकेनं (Airtel Payments Bank) गुरूवारी सेफगोल्ड (Safegold) सोबत करार करून गोल्ड इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म डिजिगोल्ड लाँच केला.

सेल्फगोल्ड हा एक डिजिटल गोल्ड प्रोवायडर आहे.

डिजिगोल्ड प्लॅटफॉर्मचा वापर करून एअरटेल पेमेंट्स बँकेच्या बचत खात्याच्या ग्राहकांना २४ कॅरेट सोन्यात गुंतवणूक करता येणार आहे.

याशिवाय त्यांना आपल्या कुटुंबातील सदस्य, मित्रांनाही डिजिगोल्ड गिफ्ट करण्यात सक्षम असतील. फक्त यासाठी त्यांच्याकडे एअरटेल पेमेंट्स बँकेसोबत बचत खातं असणं आवश्यक आहे.

पेमेंट्स बँकेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ग्राहकांनी खरेदी केलेले सोने सेफगोल्डद्वारे सुरक्षितपणे सिक्युर केलं जाईल आणि एअरटेल थँक्स अॅपच्या माध्यमातून ग्राहक कधीही ते सहजपणे विकू शकतात.

यासाठी कोणत्याही गुंतवणूकीचे किमान मूल्य आवश्यक नाही आणि ग्राहक किमान एका रुपयाने सुरुवात करू शकतात असेही कंपनीनं नमूद केलं.

डिजिगोल्ड आमच्यासाठी एक नव्या बँकिंग प्रस्तावाचा एक सोपा आणि सुरक्षित प्लॅटफॉर्म आहे, असं मत एअरटेल पेमेंट्स बँकेचे सीओओ गणेश अनंतनारायण यांनी व्यक्त केलं.

आमचे ग्राहक अत्यंत सोप्या पद्धीनं डिजिटल रूपात सोन्यात गुंतवणूक करू शकतात. आम्ही ग्राहकांना नियमित रुपानं गुंतवणूक करण्यास सक्षम बनवण्यासाठी सातत्यानं योजना सुरू करण्यावर विचार करत आहोत, असंही ते म्हणाले.

गुंतवणूकीचं आवडतं साधन म्हणून पुन्हा एकदा सर्व सोन्याकडे वळले आहेत, असी प्रतिक्रिया सेफ गोल्डचे व्यवस्थापकीय संचालक गौरव माथुर यांनी दिली.

आम्ही ग्राहकांची आवड आणि त्यांच्या आवडीची पद्धत आणि मूल्य डिजिटल गोल्ड संबंधित प्रोडक्टची सीरिज सादर करण्यासाठी एअरटेल पेमेंट्स बँकेसोबत करार केला आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

एअरटेल पेमेंट्स बँकेनं नुकतंच रिझर्व्ह बँकेनुसार आपल्या सेव्हिंग डिपॉझिट लिमिटला वाढवून २ लाख रूपये केलं आहे.

बँक आता १-२ लाख रूपये जमा रकमेवर ६ टक्के दरानं व्याज देत आहे.