२५ राज्यांनी Petrol-Diesel वरील व्हॅटमध्ये कपात करून दिला दिलासा; महाराष्ट्रासह 'या' राज्यांत निर्णय नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2021 07:45 PM2021-11-13T19:45:20+5:302021-11-13T19:55:19+5:30

Petrol Diesel VAT Reduced : दिवाळीपूर्वी म्हणजेचच ३ नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुक्ल कमी करून अनुक्रमे ५ आणि १० रूपयांची कपात केली होती.

दिवाळीपूर्वी म्हणजेचच ३ नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुक्ल कमी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर पेट्रोलच्या किंमतीत ५ रूपयांची आणि डिझेलच्या किंमतीत १० रूपयांची कपात झाली होती. या निर्णयानंतर २५ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांनी वॅटमध्ये कपात करत नागरिकांना आणखी दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता.

ज्या राज्यांनी अथवा केंद्र शासित प्रदेशांनी आतापर्यंत पेट्रोल डिझेलवरी व्हॅटवर कोणतीही कपात केली नाही त्यामध्ये महाराष्ट्र, दिल्ली, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, तेलंगण, आंध्रप्रदेश, केरळ, झारखंड, छत्तीसगढ आणि राजस्थान यांचा समावेश आहे.

लक्षद्विपमध्ये केंद्र शासित प्रदेशाचं सरकार सद्यस्थितीत जे पेट्रोल डिझेल खरेदीकरत त्यावर केरळ सरकारला व्हॅट दिला दिला जातो. तर केंद्र शासित प्रदेशामध्ये पेट्रोल आणि डिझेलवर कर शून्य आहे.

व्हॅटमध्ये कपात केल्यानंतर पंजाबमध्ये पेट्रोलची किंमत सर्वाधिक म्हणजेच १६.०२ रूपयांनी कमी झाली. यानंतर लडाखमध्ये १३.४३ रूपयांनी कर्नाटकमध्ये १३.३५ रूपयांनी पेट्रोलचे दर कमी झाले.

अंदमान आणि निकोबार येथे पेट्रोलचे दर सर्वात कमी म्हणजे ८२.९६ रूपये प्रति लिटर इतके आहेत. तर अरूणाचल प्रदेशमधील इटानगर येथे पेट्रोल ९२.०२ रूपये प्रति लिटर आहे. राजस्थानच्या जयपूरमध्ये पेट्रोलची किंमत ११७.४५ रूपये प्रति लिटर इतकी आहे. तर मुंबईमध्ये पेट्रोलचे दर ११५.८५ रूपये इतके आहेत.

केंद्र शासित प्रदेश लडाखमध्ये डिझेलचे दर १९.६१ रूपयांनी सर्वात कमी करण्यात आले. तर यानंतर कर्नाटकमध्ये डिझेलचे दर १९.४९ रूपयांनी कमी करण्यात आले,तर पुदुच्चेरीमध्ये १९.०८ रूपयांनी पेट्रोल स्वस्त झालं.

देशात सर्वात स्वस्त डिझेलही अंदमान निकोबार येथे मिळतं. या ठिकाणी डिझेलचे दर ७९.५५ रूपये प्रति लिटर इतके आहेत. जयपूरमध्ये डिझेलची किंमच १०८.३९ रूपये प्रति लिटर आणि विशाखापट्टणम येथे डिझेलचे दर १०७.४८ रूपये प्रति लिटर झाले आहे.