Aadhaar Pan Link: पॅन आधार लिंक करण्याची अखेरची तारीख आली जवळ; असं चेक करा स्टेटस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 11:55 AM2021-06-24T11:55:41+5:302021-06-24T12:09:07+5:30

PAN-Aadhaar लिंक करण्यासाठी ३० जून ही अखेरची तारीख. लिंक न केल्यास वाढू शकतात समस्या, भरावा लागू शकतो दंड.

Aadhaar Pan Card Link: सध्या आधार कार्ड आपल्या महत्त्वाच्या दस्तऐवजांपैकी एक झालं आहे. सरकारी योजना असतील किंवा अन्य कोणत्या बाबी अनेक ठिकाणी आधार कार्डाबाबत विचारणा केली जाते.

आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. अशा परिस्थितीत आपण अद्याप पॅनकार्ड आधार कार्डशी जोडलेलं नसेल तर ३० जूननंतर आपल्या समस्या वाढू शकतात.

या महिन्याच्या अखेरीस, आपण पॅन कार्डला आधारसह लिंक न केल्यास आपले पॅनकार्ड निष्क्रिय होईल. अशा परिस्थितीत तुम्हाला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागेल. तसेच तुम्हाला दंडही भरावा लागू शकतो.

जर तुम्ही आधार पॅन लिंक केलं असेल तर तुम्ही त्याचं स्टेटस एकदा तपासून पाहा. यासाठी www.incometaxgov.in या वेबसाईटवर लिंक करावं लागेल. त्यानंतर होम पेजवर असलेल्या सेक्शनमध्ये जाऊन आधार ऑप्शनवर क्लिक करा.

लिंक आधार सेक्शनच्या आत 'Know About Your Aadhaar Pan Linking Status' वर क्लिक करा. त्यानंतर एक विंडो ओपन होईल. त्या ठिकाणी तुमच्या आधार कार्डाशी आणि पॅन कार्डाशी निगडीत डिटेल्स भरा.

एकदा संपूर्ण माहिती टाकल्यानंतर 'View Link Aadhaar Status' वर क्लिक करा. त्यानंतर तुमचं सध्याचं स्टेटस काय आहे हे दिसून येईल.

याशिवाय तुम्हाला तुमचं स्टेटस एसएमएसद्वारेही पाहता येऊ शकतं. तुमच्या रजिस्टर्ड क्रमांकावरून तुमचा १२ अंकी आधार कार्ड क्रमांक लिहा. त्यानंतर स्पेस देऊन तुमचा पॅन कार्ड क्रमांक टाईप करा.

यानंतर तो मेसेज 567678 किंवा 56161 या क्रमांकावर पाठवा. त्यानंतर तुम्हाला तुमचं स्टेटस एसएमएसद्वारे मिळून जाईल.

दरम्यान, तुम्हाला आधार कार्डावरील पत्ता किंवा अन्य कोणती माहिती बदलायची असेल तर तो बदल करणं आता पूर्वीच्या तुलनेत अधिक सोपं झालं आहे. याशिवाय या गोष्टी तुम्हाला घरबसल्याही बदलता येणार आहेत.

UIDAI नं पत्ता, नाव, जन्मतारीख असे महत्त्वाचे बदल करण्याची प्रक्रिया आता सोपी केली आहे. आता मोबाईल फोनद्वारे घरबसल्या हे काम करणं सोपं झालं आहे.

जर तुम्हाला नाव, पत्ता, जन्मतारीख यात कोणतेही बदल करायचे असतील तर खालील प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करावी लागेल.

आधार कार्डावर पत्ता बदलण्यासाठी resident.uidai.gov.in या वेबसाईटवर जा. त्यानंतर Aadhaar Update Section मध्ये देण्यात आलेल्या 'Request Aadhaar Validation Letter' वर क्लिक करा. त्यानंतर सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्टल ओपन होईल.

त्यानंतर तुमच्या १२ अंकी आधार कार्डाद्वारे लॉग इन करा. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे एक लिंक येईल.

ओटीपी आणि कॅप्चा टाकून व्हेरिफाय करा. त्यानंतर 'Proceed to Update Address' वर क्लिक करून Update Address via Secret Code चा पर्याय निवडावा लागेल.

सिक्रेट कोड एन्टर केल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या सबमिट या बटणावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला दिसणारा अपडेच रिक्वेस्ट नंबर सेव्ह करून ठेवा.

Read in English