आईनेच ढकलले होते वेश्या व्यवसायात, बायोपिकमधून उलगडणार सेक्स वर्कर ते पॉर्न स्टारपर्यंतचा शकीलाचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 10:18 AM2020-12-17T10:18:49+5:302020-12-17T10:31:43+5:30

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अडल्ट स्टार शकीला हिच्या वादग्रस्त जीवनावर आधारित आहे. या सिनेमात हिंदी चित्रपटसृष्टीची अभिनेत्री रिचा चढ्ढा ही शकीलाची भूमिका साकारत आहे. नुकतंच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

शकीला साकारणाऱ्या रिचाने यांत केरळची पारंपरिक साडी परिधान केली आहे.

अडल्ट सिनेमांमधून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेल्या शकीलाने वयाच्या २०व्या वर्षी १९९५ साली आलेल्या प्लेगर्ल्स या पॉर्न सिनेमातून आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती.

याच शकीलाचे वादग्रस्त आत्मचरित्रही प्रसिद्ध झाले होते. यांत शकीलाने अनेक धक्कादायक गौप्यस्फोट आणि खुलासे केले होते.

तिचे हेच खुलासे आता सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर येणार आहेत. आपल्या आईने जीवन उद्धवस्त केल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट शकीलाने यांत केला होता.

आईच्या परवानगीने एका व्यक्तीने बलात्कार केला होता. त्या मोबदल्यात आईला त्याने पैसे दिले होते असा खुलासा तिने या आत्मचरित्रात केला आहे.

शालेय जीवनात इंग्रजीवर प्रभुत्व असलेल्या शकीलाला सहावीनंतर दुर्दैवाने परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडावं लागलं होतं.

उदरनिर्वाहासाठी मग आईनेच वेश्या व्यवसायात ढकलल्याचे तिने सांगितले आहे. वेश्या व्यवसाय करतानाच सुरुवातीच्या काळात फुकटात पॉर्न सिनेमात काम केल्याचेही तिने आत्मचरित्रात नमूद केले आहे.

शकीलाचे नाव अनेक दिग्दर्शक आणि कलाकारांशीही जोडलं गेले होते. तिच्या अफेअरच्या चर्चाही रंगल्या, मात्र ती अविवाहितच राहिली.

अ‍ॅडल्ड फिल्म्समध्ये काम करुन बनली फेमस, आता रिलाज होतोय बायोपिक

तिचा हाच जीवनपट रुपेरी पडद्यावर रसिकांना पाहायला मिळणार आहे.

कालांतरानं तिचं जीवन पालटलं आणि दाक्षिणात्य पॉर्नस्टार म्हणून ती लोकप्रिय झाली. सिल्क स्मिता शकीलाची आदर्श आहे.

Read in English