Yami Gautam Birthday: यामी गौतमने असा साजरा केला लग्नानंतरचा पहिला वाढदिवस, आता फोटो होताहेत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 11:21 AM2021-11-29T11:21:22+5:302021-11-29T11:24:46+5:30

Yami Gautam Birthday: अभिनेत्री यामी गौतम हिने रविवारी तिचा वाढदिवस कुटुंबामध्ये धुमधडाक्यात सारजा केला. आता या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लग्नानंतरचा पहिलाच वाढदिवस असल्याने यामीसाठी हा वाढदिवस खास होता.

अभिनेत्री यामी गौतम हिने रविवारी तिचा वाढदिवस कुटुंबामध्ये धुमधडाक्यात सारजा केला. आता या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लग्नानंतरचा पहिलाच वाढदिवस असल्याने यामीसाठी हा वाढदिवस खास होता.

यामीने तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यात तिने पती आदित्य धर याचे आभार मानले आहेत. तसेच आदित्यसारखा जोडीदार लाभल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजते, असेही यामीने सांगितले.

यामीला मोठे सोहळे करायला आवडत नाही. ती कुटुंबासह साधेपणाने वाढदिवस साजरा करते. तिची हीच गोष्ट तिच्या चाहत्यांना खूप आवडते.

बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम हिने याचवर्षी आदित्य धर याच्याशी विवाह केला होता. तेव्हा यामीने लग्नाचे फोटो शेअर करून चाहत्यांना धक्का दिला. कारण यामीने तिचे आदित्यसोबतचे नाते सर्वांपासून लपवून ठेवले होते.

यामी गौतम ही बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक असून, तिचे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.