'या' इटालियन मॉडेलमुळे मोडला सैफ-अमृताचा संसार?; Extra Marital Affair पडलं महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 11:39 AM2021-11-22T11:39:52+5:302021-11-22T11:51:54+5:30

Saif ali khan: सैफने एका मुलाखतीत अमृताच्या वागण्यामुळे घटस्फोट घेतल्याचं सांगितलं होतं. परंतु, एका अभिनेत्रीमुळे या दोघांचा संसार उद्धवस्त झाल्याचं म्हटलं जातं.

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान विविध कारणांमुळे चर्चेत येत आहे. नुकताच त्याचा 'बंटी और बबली 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला.

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान विविध कारणांमुळे चर्चेत येत आहे. नुकताच त्याचा 'बंटी और बबली 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला.

सैफने २०१२ मध्ये अभिनेत्री करीना कपूर -खानसोबत लग्न केलं. आज या दोघांना तैमूर आणि जहांगीर ही दोन मुलं आहेत. मात्र, तरीदेखील सैफच्या पहिल्या पत्नीची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगत असते.

सैफने १९९१ मध्ये अमृता सिंगसोबत लव्ह मॅरेज केलं. मात्र, त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. लग्नाच्या १३ वर्षानंतर ही जोडी विभक्त झाली.

सैफ -अमृताचा घटस्फोट झाल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलं होतं. या जोडीच्या घटस्फोटामागे अनेक कारणं असल्याचं म्हटलं जातं.

सैफने एका मुलाखतीत अमृताच्या वागण्यामुळे घटस्फोट घेतल्याचं सांगितलं होतं. परंतु, एका अभिनेत्रीमुळे या दोघांचा संसार उद्धवस्त झाल्याचं म्हटलं जातं.

सैफ रोजा कॅटलानो या इटालियन मॉडेलच्या प्रेमात पडल्यामुळे त्याने अमृताची फसवणूक केल्याचं म्हटलं जातं.

रोजा आणि सैफची पहिली भेट २००४ मध्ये केनियामध्ये झाली होती. या काळात सैफ आणि अमृताच्या नात्यात अनेक चढउतार येत होते. त्यातच रोजा भेटल्यामुळे तो तिच्या प्रेमात पडला.

सैफ आणि रोजाच्या अफेअरची कुणकुण त्यावेळी अमृताला लागली होती. त्यामुळे सैफ करत असलेली फसवणूक तिला मान्य नव्हती.

२००४ साली अमृता आणि सैफने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे सैफसाठी रोजा मुंबईत आली होती. मात्र, येथे आल्यावर सैफला पत्नी आणि दोन मुलं असल्याचं समजलं.