कोण आहे तरी कोण पूनम पांडेसोबत लग्न करणारा हा सॅम बॉम्बे? जाणून घ्या A to Z माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 02:19 PM2020-09-11T14:19:20+5:302020-09-11T14:25:18+5:30

सॅमसोबत पूनमच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. हे फोटो शेअर करत पूनमने कॅप्शन लिहिले आहे की, 'पुढची सात जन्मं मला तुझ्यासोबत रहायचं आहे'.

आपल्या बोल्डनेसमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या मॉडल-अभिनेत्री पूनम पांडेने नुकतेच बॉयफ्रेन्ड सॅम बॉम्बेसोबत गुपचूप लग्न केलं. अचानक आलेल्या या बातमीने नक्कीच पूनमच्या फॅन्सना धक्का बसला असेल. पण नेहमीच चर्चेत राहणाऱ्या पूनमचा पती कोण आहे? तो काय करतो? असे प्रश्न तिच्या फॅन्सना पडले असतील. त्यामुळे आम्ही पूनमचा पती सॅम बॉम्बेची A to Z माहिती त्यांच्यासाठी घेऊन आलो आहोत.

सॅमसोबत पूनमच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. हे फोटो शेअर करत पूनमने कॅप्शन लिहिले आहे की, 'पुढची सात जन्मं मला तुझ्यासोबत रहायचं आहे'.

सॅम बॉम्बे हा व्यवसायाने एक निर्माता, दिग्दर्शक, संकलक आहे. महत्वाची बाब म्हणजे तो मूळचा दुबईचा आहे. एका श्रींम भारतीय कुटूंबात सॅमचा दुबईत जन्म झाला. शिक्षणही त्याने दुबईतच घेतले. बालपणापासूनच सॅमला फिल्ममेकिंगची आवड होती. त्यामुळे यूनिव्हर्सिटी ऑफ दुबईतून ग्रॅज्युएशन केल्यावर तो महानगरी मुंबईत दाखल झाला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सॅमने इंडस्ट्रीत निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून करिअरला सुरूवात केली. सॅमने २०१७ मध्ये “King of the Ring” ही एक शॉर्टफिल्म केली होती. ज्यात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होता.

तसेच सॅमने रिजनल एक्झिक्युटीव्ह क्रिएटीव्ह डिरेक्टर म्हणूनही अनेक कंपन्यांसाठी काम केलं. तसेच ब्रॅंडींग क्षेत्रातही तो काम करतो. त्याने Rediffusion Dentsu Young and Rubicam Private Ltd कंपनीतही काम केलंय. इथे तो व्हाइस चेअरमनसारख्या पोस्टवर होता. तसेच त्याने Studio Central नावाची कंपनीही काढली.

सॅम बॉम्बेने वेगवेगळ्या ब्रॅन्डसाठी जाहिरातींचं दिग्दर्शनही केलंय. ज्यात Sparx, Shyam Steel, Oppo, Amazon या आणि इतरही कंपन्यांचा समावेश आहे. तसेच त्याने Gal Ban Gayi आणि Befikra सारखे म्युझिक व्हिडीओही दिग्दर्शित केलेत.

सॅम बॉम्बने विराट कोहली, युवराज सिंह, अक्षय कुमार, अॅमी जॅकसन, टायगर श्रॉफ, दिशा पटानी सोनाक्षी सिन्हा यांसारख्या मोठ्या स्टारसोबतही कामे केली आहेत.

गेल्या बऱ्याच वर्षांपासून सॅम आणि पूनम पांडे एकमेकांना डेट करत होते. दोघांनी अनेकदा सोबतचे फोटोही शेअर केले होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी लग्न ठरल्याचे सांगितले होते. आता त्यांनी अचानक लग्नाचे फोटो शेअर केलेत.