PICS : सनी देओल यांची होणारी सून बॉलिवूड अभिनेत्रींनाही देते टक्कर, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 05:00 PM2022-05-17T17:00:24+5:302022-05-17T17:09:21+5:30

who is Karan Deol fiance Drisha Roy: धर्मेन्द्र यांचा नातू आणि सनी देओलचा लेक करण देओलनं नुकताच कथितरित्या गुपचूप साखरपुडा उरकला. गर्लफ्रेंड द्रिशासोबत त्याची एंगेजमेंट पार पडली. द्रिशा ही कोण आहे, हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत.

धर्मेन्द्र यांचा नातू आणि सनी देओलचा लेक करण देओलनं नुकताच कथितरित्या गुपचूप साखरपुडा उरकला. गर्लफ्रेंड द्रिशासोबत त्याची एंगेजमेंट पार पडली. देओल कुटुंबाने साखरपुड्याचं वृत्त नाकारलं असलं तरी चर्चा जोरात आहे.

करणच्या टीमने असं काहीही झालेलं नसल्याचं म्हटलं आहे. करणच्या साखरपुड्याच्या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं टीमने स्पष्ट केलं आहे. पण रिपोर्टनुसार, द्रिशा व करण दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत होते आणि अखेर त्यांनी साखरपुडा उरकला.

धर्मेन्द्र यांची प्रकृती अलीकडे बरी नाही. त्यांची प्रकृती बघता देओल कुटुंबीयांनी घाईघाईत करणचा साखरपुडा उरकल्याचं म्हटलं जातंय. लवकरच करण व द्रिशा लग्न करणार असल्याचीही चर्चा आहे.

या साखरपुड्याचे फोटो समोर आलेले नाहीत. पण हो, सनी देओलच्या होणाऱ्या सूनबाईचे फोटो मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. द्रिशा ही कोण आहे, हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत.

द्रिशा ही दिवंगत चित्रपट निर्माते दिग्दर्शक बिमल रॉय यांची पणती आहे. स्ट्रगल काळात बिमल यांनीच धर्मेन्द्र यांना काम दिलं होतं. दोघांची घट्ट मैत्री होती. याच बिमल रॉय यांची पणती आता देओल घराण्याची सून होणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, द्रिशा ही एक फॅशन डिझाईनर आहे. सोबत तिचं एक युट्यूब चॅनलही आहे. यात ती फॅशन, मेकअपशी रिलेटेड व्हिडीओ पोस्ट करते.

फॅशन डिझाईनर असण्यासोबतच ती एक मेकअप आर्टिस्ट आहे. सोशल मीडियावर ती प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. बोल्डनेसच्या बाबतीत ती बॉलिवूडच्या अभिनेत्रींनाही टक्कर देते.

करण हा सनी देओलचा मोठा मुलगा. करणने ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. पण त्याचा पहिलाच चित्रपट दणकून आपटला होता.

लवकरच करण बॉबी देओल, धर्मेन्द्र व सनी देओल यांच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. ‘अपने 2’ या चित्रपटात तो दिसणार आहे. करणने याआधीही ‘यमला पगला दीवाना 2’ या चित्रपटात सेकंड युनिट डायरेक्टर म्हणून काम केलं होतं.