विराट कोहली-अनुष्का शर्माचा बॉडीगार्ड कोण आहे? त्याची सॅलरी ऐकून तर तुमचे डोळेच फिरतील

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 08:25 PM2021-08-30T20:25:05+5:302021-08-30T20:28:18+5:30

बॉलिवूड कलाकाराचे चाहते मोठ्या संख्येने असतात. त्यामुळे ते कुठेही गेले तरी लोकांची गर्दी होते. त्यामुळे कलाकारांना सुरक्षेची गरज भासते.

बॉलिवूड स्टार्सना मोठ्या फॅन फोलाईंगची आवड असते. अशावेळी जेव्हा कधीही हे कलाकार बाहेर पडतात तेव्हा लोकांची प्रचंड गर्दी त्यांच्यामागे असल्याचं दिसून येते. त्यामुळे सुरक्षेबाबतीत बॉलिवूड कलाकार खूप काळजी घेत असतात.

बॉलिवूड कलाकारांच्या सुरक्षेसाठी त्यांचे पर्सनल बॉडीगार्ड तैनात असतात. अलीकडेच अमिताभ बच्चन यांच्याकडे असलेल्या सुरक्षा रक्षकाची कमाई ऐकून भलेभले चकीत झाले. परंतु बॉलिवूड स्टार्स त्यांच्या सुरक्षा रक्षकांना पगार म्हणून महिन्याला खूप जास्त सॅलरी देतात.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्याकडे तिचा पर्सनल बॉडीगार्ड आहे. ज्याचं नाव सोनू आहे. सोनूचं खरं नाव प्रकाश सिंह असं आहे. प्रकाश सिंह हा अनुष्का शर्माकडे अनेक वर्षापासून कामाला आहे. भारतीय क्रिकेटर विराट कोहलीसोबत लग्न होण्यापूर्वीपासून सोनू अनुष्का शर्मासोबत आहे.

एका रिपोर्टनुसार, अनुष्का शर्मा प्रकाश सिंह उर्फ सोनूला तिच्या सुरक्षेसाठी महिन्याकाठी खूप जास्त पगार देते. झुमच्या बातमीच्या हवाल्याने सांगितलं जातं की, अनुष्का तिच्या बॉडीगार्ड सोनूला वर्षाला १.२ कोटी पगार देते. इतकी मोठी रक्कम मोठ्या कंपनीच्या सीईओलाही मिळत नसेल.

तसेच सोनू हा अनुष्का आणि विराट कोहलीसाठी केवळ एक बॉडीगार्ड नव्हे तर हे दोघंही सोनूला त्याच्या घरातील सदस्य मानतात. अनुष्का दरवर्षी सोनूचा वाढदिवस साजरा करते. २०१८ मध्ये फिल्म जीरोच्या सेटवर अनुष्कानं तिचा बॉडीगार्ड सोनूचा वाढदिवस साजरा केला होता.

अनुष्कासोबत विराट कोहली याच्याही सुरक्षेची काळजी सोनू घेतो. तसं विराट कोहलीकडे स्वत:ची पर्सनल सिक्युरिटीही आहे. परंतु तरीही अनुष्का शर्माचा सुरक्षा रक्षक सोनू याच्यावर त्याचा भरवसा आहे. सोनू विराटच्या सुरक्षेचीही काळजी घेतो.

अनुष्का शर्माच्या गरोदरपणात तिच्या सुरक्षेची जबाबदारी सोनूवर होती. गर्भवती असताना अनुष्का शर्मा काम करत होती. त्यावेळी ती व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाताना आणि येताना ती दिसून यायची. तेव्हा सोनू पीपीई किट घालून अनुष्का शर्माची सुरक्षा करत होता.

अनुष्का शर्माशिवाय बॉलिवूडचे अन्य कलाकारही पर्सनल सिक्युरिटी टीम ठेवतात. अनेकजण सुरक्षा रक्षकांना मोठी रक्कम देतात. इंडस्ट्रीमध्ये सर्वात प्रसिद्ध बॉडीगार्ड सलमान खानच्या शेराला ओळखलं जातं. सलमान खान त्याच्या सुरक्षेसाठी शेराला दर महिना १५ लाख म्हणजे वर्षाकाठी २ कोटी रुपये देतो.

तर अभिनेत्री दिपीका पादुकोण हिचा बॉडीगार्ड जलालही खूप प्रसिद्ध आहे. जलाल अनेक वर्षापासून दिपीकाच्या सुरक्षेची काळजी घेतो. तो दिपीकासोबत सावलीसारखा कायम असतो. दिपीका जलालला तिच्या स्टाफप्रमाणे नाही तर भावाप्रमाणे मानते. दरवर्षी दिपीका त्याला राखी बांधते

इतकचं नाही तर दिपीका पादुकोण आणि रणवीर सिंहच्या लग्नाच्या समारंभाला जलाल त्याठिकाणी वेन्यू सिक्युरिटी हेड होता. रिपोर्टनुसार, दिपीका पादुकोण जलाल स्वत:च्या सिक्युरिटीसाठी वर्षाला ८० लाख ते १.२ कोटी रुपये रक्कम देते.