सतत बोल्ड भूमिकाच ऑफर व्हायच्या म्हणून ‘या’ अभिनेत्रीनं सोडलं बॉलिवूड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 04:13 PM2021-05-28T16:13:43+5:302021-05-28T16:20:38+5:30

अभिनेत्री रिया सेनला काही मोजके सिनेमांचा अपवाद वगळता तिला बॉलीवुडमध्ये फारसं यश मिळालं नाही. 'स्टाईल', 'झनकार बीट्स' आणि 'अपना सपना मनी मनी' या सिनेमातून तिनं रसिकांची मनं जिंकली खरी मात्र आज रिया बॉलिवूडमधून गायब आहे.

करियरच्या सुरुवातीपासूनच रियाकडे सेक्सी अभिनेत्री म्हणूनच पाहिलं गेलं आणि त्याप्रकारच्या भूमिका तिला मिळत गेल्या.

रियाला सेक्सी भूमिकांचा वीट आला होता.त्यामुळेच अशा भूमिका मला नको असंच जाहीर करुन टाकलं.

सेक्सी या शब्दाचा अर्थच नेमका काय हे आजवर कुणालाच कळला नाही असं रियाने म्हटले होते.

हिंदी सिनेमा दिग्दर्शकांना वाटतं की आपण कायम मिनी स्कर्ट परिधान करावा, अंगप्रदर्शन करावं. मात्र या सगळ्या गोष्टींना सेक्सी म्हणत नाहीत.

सेक्सी म्हणजे एखाद्या व्यक्तीची पर्सनालिटी.आपल्याला कुणीही सेक्सी म्हटलं तर आवडेल.

तरीही बॉलीवुडच्या सिनेमात काम करताना फार मजा आली नसल्याचं रियाने स्पष्ट केले होते.

त्यामुळेच तिने आपला मोर्चा इतर भाषिक सिनेमाकडे वळवला. बंगाली दिग्दर्शकांनी आपल्याला चांगल्या भूमिका ऑफर केल्या.

त्या भूमिकांमध्ये काही तरी वेगळं सांगण्यासारखं होतं. केवळ लोकांना सेक्सी आवडतं म्हणून कमी कपड्यात मला दाखवणं असं त्यांनी काही केलं नाही.

ज्यावेळी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं त्यावेळी लहान होतो आणि फारशी जाण नव्हती. इथलं वातावरण, लोक यांची माहिती नव्हती.

काळानुरुप वयानुसार आपल्यात बदल झाले असून चांगलं काय, वाईट काय याची समज आल्याचं तिने सांगितले आहे.

आगामी काळात काही तरी वेगळेपण, नाविन्य असलेल्या भूमिका ऑफर झाल्या तरच स्विकारणार असल्याचे तिने म्हटले होते.