आजपर्यंत रणबीर कपूर सारखा व्यक्ती पाहिला नाही, असे का म्हणाली आलिया भट्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 03:20 PM2021-07-06T15:20:06+5:302021-07-06T15:43:51+5:30

बॉलिवूडमध्ये लव्ह बर्ड्स रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लव्ह स्टोरीची जोरदार चर्चाही होत असते. दोघांनी आजपर्यंत त्याच्या नात्याची कबुली दिली नसली तरी दोघेही फोटो शेअर करत अप्रत्यक्षपणे प्रेमाची कबुली देत असतात.

हे कपल नेहमीच सा-यांच्या चर्चेचा विषय ठरतात.

दोघेही कायमच एकत्र पाहायला मिळतात.

इतकेच काय दोघेही एकत्र व्हॅकेशनसाठी मालदीव्हजलाही गेले होते.

दोघांमध्ये प्रेमांकुर फुलले असून दोघांचं नातं दिवसेंदिवस बहरत चाललं आहे.

दोघेही सोशल मीडियावर प्रत्येक अपडेट शेअर करत असतात.

सध्या दोघांच काय सुरु आहे असा प्रश्न यांच्या फॅन्सना पडणं साहजिकच आहे.

मात्र तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सोशल मीडिया अकाउंटवर मिळतील.

दोघेही सोशल मीडियावर बरेच अॅक्टिव्ह असतात.

त्यामुळे हे कपल सध्या काय करते आणि कुठे आहे याची उत्तरं इथेच मिळतील.

असे असले तरी एकदा रणबीरबद्दल आलियाने मुलाखतीत एक गोष्ट सांगितली होती.

माझ्या आयुष्यात आजपर्यंत मी रणबीरसारख्या लोकांना पाहिले नाही असे म्हणत तिने रणबीरचे कौतुक केले होते.