Photos : अशी रंगली काजल अग्रवालची ‘बॅचलर पार्टी’! तुम्ही फोटो पाहिलेत का?

By रूपाली मुधोळकर | Published: October 7, 2020 12:43 PM2020-10-07T12:43:23+5:302020-10-07T12:52:13+5:30

या बॅचरल पार्टीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

बॉलिवूड आणि साऊथ अभिनेत्री काजल अग्रवाल लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून काजलच्या लग्नाच्या चर्चा होत्या. मात्र आता स्वत; अभिनेत्रीने या गोष्टीला दुजोरा दिला आहे. काजलने सोशल मीडियावर त्याच्या लग्नाची तारीख सांगितली आहे. यानंतर काय तर काजलची बॅचलर पार्टीही धडाक्यात रंगली.

या बॅचरल पार्टीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

काजलची बहिण निशा अग्रवाल शिवाय तिच्या काही मैत्रिणींनी बॅचरल पार्टीचे फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये काजल ब्लॅक कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये अतिशय सुंदर दिसतेय. डोक्यावर बॅक कलरचा प्ले बॉय हेअरबँड लावून ती धम्माल मस्ती करतेय.

काजलच्या होणा-या पतीचे नाव गौतम किचलू आहे. गौतम एक बिझनेसमॅन आहे. पेशाने इंटिरिअर डिझाईनर आहे.

काल काजलने लग्न करणार असल्याची बातमी कन्फर्म केली होती. ‘मला हे सांगताना अतिशय आनंद होतो की मी गौतम किचलूसोबत 30 ऑक्टोबरला लग्न करते आहे. जवळच्या कुटुंबीयांच्या उपस्थिती मुंबईत हा लग्न सोहळा पार पडणार आहे,’असे तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले होते.

काजल अग्रवालने 2004 मध्ये आलेल्या ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉयच्या ‘क्यों, हो गया ना’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यात काजलने ऐश्वर्याच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती.

त्यानंतर तिने कल्याण रामसोबत 2007 मध्ये ‘लक्ष्मी कल्याणम’ या तेलगु सिनेमातून साऊथमध्ये डेब्यू केला होता.

तिच्या वर्कफ्रंटबाबत सांंगायचे झाल्यास सध्या मोसागल्लू, आचार्य, मुंबई सागा, हे सिमिनिका असे सिनेमे काजल कडे आहेत.

काजलला खरी ओळख मिळाली ती एस.एस. राजमौली यांच्या ‘मगधीरा’ सिनेमातून.

साऊथमध्ये काजलला जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे.

Read in English