कधी सेल्समन होता, आज आहे साऊथचा सुपरस्टार! विजय सेतुपतीला आज कोण ओळखत नाही!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 03:17 PM2022-01-16T15:17:20+5:302022-01-16T15:28:24+5:30

Vijay Sethupathi Birthday Special : विजय सेतुपती आज सुपरस्टार आहे. पण इथपर्यंत पोहोचण्यासाठीचा त्याचा स्ट्रगल मोठा आहे. तामिळनाडूतील राजपालयम या गावातील अगदीच सामान्य परिवारात विजय सेतुपतीचा जन्म झाला...

टॉलिवूडचा सुपरस्टार विजय सेतुपतीला आज कोण ओळखत नाही. विजय सेतुपतीचा आज वाढदिवस. लवकरच विजय सेतुपती बॉलिवूड डेब्यू करतोय. कतरिना कैफसोबत ‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटात तो झळकणार आहे.

विजय सेतुपती आज सुपरस्टार आहे. पण इथपर्यंत पोहोचण्यासाठीचा त्याचा स्ट्रगल मोठा आहे. तामिळनाडूतील राजपालयम या गावातील अगदीच सामान्य परिवारात विजय सेतुपतीचा जन्म झाला.

सेतुपतीला ना अभ्यासात गती होती, ना खेळात रूची. त्याच्या डोक्यात फक्त आणि फक्त अ‍ॅक्टिंगचा किडा होता. अ‍ॅक्टिंगमध्ये येण्याआधी त्याने अनेक छोट्यामोठ्या नोक-या केल्या.

एका रिटेल स्टोरमध्ये सेल्समन म्हणून तो राबला. यानंतर एका फास्ट फूड जॉइंटवर कॅशिअर म्हणूनही काम केलं. पॉकेट मनीसाठी अगदी फोन बुथवरही त्यानं नोकरी केली.

कॉमर्समध्ये पदवी घेतल्यानंतर कुटुंबाची आर्थिक गरज भागवण्यासाठी विजय सेतुपतीने दुबईला जायचा निर्णय घेतला. पण या नोकरी त्याचं मन रमलं नाही. अखेर त्याने भारतात परण्याचा निर्णय घेतला.

दुबईवरुन परत आल्यानंतर विजयने पुन्हा पैशासाठी अनेक कामं केलीत. इंटिरिअर डिझाईनिंग, मार्केटींगचं काम त्यानं केलं. पण कुठेही त्याचं मन रमेना. अखेर त्याने चेन्नईचा एक थिएटर ग्रुप जॉईन केला. या ठिकाणी तो अभिनयासोबतच अकाउंटचे कामही करायचा.

सुरूवातीला त्याला सपोर्टिंग अ‍ॅक्टरचा रोल मिळाले. टीव्हीचे काही शो त्याने केले आणि अखेर 2011 मध्ये त्याला पहिला ब्रेक मिळाला. सीनू रामासामी यांच्या ‘थेनमेरकु पारूवाकात्रू’ या चित्रपटात तो लीड हिरो म्हणून झळकला आणि एका रात्रीत स्टार झाला.

त्याच्या पहिल्याच चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आणि इथूनच विजय सेतुपतीच्या करिअरनं वेग पकडला. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही.

आज विजय सेतुपती कोट्यावधींचा मालक आहे. मीडिया रिपोर्टनुसार,विजय सेतुपतीची नेटवर्थ सुमारे 110 कोटी रूपये आहे.

टॅग्स :TollywoodTollywood