नेहमी साडीमध्ये दिसणारी विद्याने बोल्ड फोटोशूट करत उडवली होती चाहत्यांची झोप, See Pic

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 04:42 PM2020-08-19T16:42:46+5:302020-08-19T16:59:04+5:30

वैविध्यपूर्ण आणि दर्जेदार तितक्याच संवेदनशील भूमिका साकारत रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलेली अभिनेत्री म्हणजे विद्या बालन. विविध सिनेमांतील भूमिकांनी चित्रपटसृष्टीत वेगळे स्थान मिळवलं आहे.

डर्टी पिक्चर सिनेमा असो किंवा 'कहानी, पा असो किंवा भुलभुलैय्या,शकुंतला अशा कित्येक सिनेमात विद्याने आपल्यातील अभिनय कौशल्य दाखवून दिले आहे.

आजवर विद्याने आपल्या दमदार अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत.

विद्याबालनचे साडीप्रेम जगजाहीर आहे, वेगवेगळ्या साड्या परिधान करत ती रसिकांचे लक्ष वेधून घेते

नेहमी साडीमध्येच सौदर्यांला चार चाँद लावणारी विद्या जेव्हा वेस्टर्न आऊटफिटमध्येही तितकीच ग्लॅमरस दिसते.

पारंपरिक अंदाजाप्रमाणे वेस्टर्न आऊटफिटमधील फोटोंवर तिच्या चाहत्यांकडून तुफान लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असतो.

आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत आधीपेक्षा जास्त सजग झाली आहे.

करिअरच्या सुरूवातीच्या फोटों आणि सध्याचे फोटोंवर नजर टाकली तर तिच्या लूकमध्ये झालेला हा बदल सहजच कुणालाही लक्षात येईल.

नेहमीच आपली अदा, सौंदर्य, फॅशन, स्टाइल आणि चेहऱ्यावरील प्रचंड आत्मविश्वास तिच्या या फोटोमध्ये पाहायला मिळते आहे.

भूमिकेप्रमाणेच विद्याच्या स्टाइलवरही चाहते फिदा होतात.

रसिकांची लाडकी विद्या सिद्धार्थ रॉय-कपूरसह रेशीमगाठीत अडकली. मात्र लग्नानंतरही विद्याची जादू कमी झालेली नाही.