Katrina Kaif And Vicky kaushal Wedding :आज अडणाकर लग्नबंधनात, या मुहूर्तावर घेणार सात फेरे !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 11:27 AM2021-12-09T11:27:22+5:302021-12-09T11:37:44+5:30

Katrina Kaif And Vicky kaushal आज ९ डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. मीडियाचेच नाही तर या शाही लग्नावर चाहतेही लक्ष ठेवून आहेत.चित्रपटसृष्टीतील बड्या स्टार्सपासून अनेक निर्माते आणि दिग्दर्शक या लग्नाला हजर असल्याच्या बातम्या येत आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, विकी आणि कतरिनाच्या लग्नाच्या सुरक्षेसाठी खूप खास व्यवस्था करण्यात आली आहे.

या लग्नाला येणार्‍या पाहुण्यांना एक खास कोड देण्यात आला आहे.

हा कोड दाखवूनच पाहुण्यांना लग्नात प्रवेश घेता येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

या लग्नातली छोट्यातली छोटी अपडेट समोर येत आहेत.

विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नात पाहुण्यांना मोबाईल फोन वापरण्यास मनाई असेल.

या लग्नातले कोणतेच व्हिडीओ फोटो व्हायरल होणार नाहीत यासाठी ही खबरदारी पाळण्यात आली आहे.

कतरिना कैफ आणि विकी कौशल त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ Amazon Prime Video ला 80 ते 100 कोटींमध्ये विकणार आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, विकी कौशल आणि कतरिना कैफ एका खास वेळेत सात फेरे घेतील.

असे सांगितले जात आहे की विकी कौशल आणि कतरिना कैफ आज दुपारी ठीक 3:30 ते 3:45 च्या दरम्यान सात फेरे घेत पती पत्नीच्या बंधनात अडकतील.