बाबो, 3000 रूपये लिटरचे पाणी! चर्चा काय तर उर्वशी रौतेलाच्या पाण्याच्या बाटलीची

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 03:13 PM2021-03-19T15:13:35+5:302021-03-19T15:44:58+5:30

होय, उर्वशी नुकतीच मुंबई एअरपोर्टवर दिसली. यावेळी तिच्या हातातील पाण्याच्या बाटलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

‘ग्रेट ग्रँड मस्ती’फेम उर्वशी रौतेलाचा थाट पाहाल तर चाट पडाल. होय, सध्या काय तर उर्वशी पित असलेल्या पाण्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.

होय, उर्वशी नुकतीच मुंबई एअरपोर्टवर दिसली. यावेळी तिच्या हातातील पाण्याच्या बाटलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

ही काही साधारण पाण्याची बाटली नव्हती. कारण आपल्या देशातील काही मोजके लोकच या बाटलीतील महागडे पाणी पितात.

होय, या नॅचरल अल्कलाईन वॉटरच्या एका लीटरच्या बाटलीची किंमत 1200 ते 3000 रूपयांपर्यंत आहे.

कोरोना काळात भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली व अन्य काही सेलिब्रिटींनी ब्लॅक वॉटर प्यायला सुरुवात केली होती. जेणेकरून इम्युनिटी वाढून स्वत:ला फिट ठेवता येईल.

असे म्हणतात की, हे पाणी हायड्रटेड होण्यासाठी मदत करून तुमचा पीएच वाढवतो. या पाण्यात वेगवेगळ्या प्रकारचे मिनरल्स वापरले जातात. यामुळे या पाण्याचा रंग काळा असतो.

2011 मध्ये उर्वशीने मिस टुरिस्ज्म क्वीन ऑफ द ईअरचा किताब जिंकला.

याचवर्षी तिने मिस एशिअन सुपर मॉडेलच्या किताबावर आपले नाव कोरले.

‘सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला. यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती.

यानंतर बॉलिवूड रॅपर हनी सिंह याच्या ‘लव डोस’ या अल्बममध्ये उर्वशी दिसली होती.