बॉलिवूडचीही प्रसिध्द अभिनेत्री ठरली दाक्षिणात्य इंडस्ट्रीची सर्वांत महागडी अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 12:49 PM2021-04-07T12:49:22+5:302021-04-07T13:07:25+5:30

Urvashi Rautela soon to feature in a South movie, चित्रपटात ती एका मायक्रोबायोलॉजिस्ट आणि एक आयआयटीयन च्या भूमिकेत दिसणार आहे.

‘सनम रे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री उर्वशी रौतेलाने तिच्या सौंदर्यानेही रसिकांवर मोहिनी घातली.

महागड्या फॅशन स्टेटमेंटमुळे चर्चेत असते त्यामुळेच बॉलिवूडची फॅशन क्वीन म्हणूनही तिला ओळखले जाऊ लागले आहे.

उर्वशीचा युनिक फॅशन सेन्स आणि तिच्या एकूणच व्यक्तिमत्त्वामुळे तिच्या फॉलोअर्सची संख्याही मोठी आहे. आताही उर्वशी रौतेला प्रकाशझोतात येण्याचे कारण तितकेच युनिक आहे.

बॉलिवूडमध्ये नशीब अजमवल्यानंतर उर्वशी रौतेला आता तामीळ सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.

चित्रपटाचं नाव अद्याप गुलदस्त्यात असलं तरीही चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात झाली आहे.

चित्रपटात ती एका मायक्रोबायोलॉजिस्ट आणि एक आयआयटीयन च्या भूमिकेत दिसणार आहे.

हा चित्रपट इतरही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच हा एक बिग बजेट चित्रपट असल्यामुळे उर्वशीला भारीभक्कम असं मानधन मिळाले आहे.

उर्वशीने चित्रपटासाठी तब्बल 10 कोटी रुपये घेतले आहेत. आणि त्यामुळेच उर्वशी तमिळ फिल्म इंडस्ट्रीची सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे. चित्रपटाचं शूटींग हे मनालीत सुरू आहे.

उर्वशी रौतेला इजिप्शियन सुपरस्टार मोहम्मद रमदान याच्यासोबत एका आंतराष्ट्रीय प्रोजेक्टमध्ये देखील काम करणार आहे, ज्यातही ती सध्या खूप व्यस्त आहे.