तब्बल १२ वर्षानंतर रंगीला गर्ल करणार कमबॅक,या कारणामुळे इंडस्ट्रीपासून होती दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 04:00 PM2021-03-09T16:00:46+5:302021-03-09T16:08:17+5:30

गेली अनेक वर्ष बॉलीवुड गाजवणारी मासूम गर्ल उर्मिला मातोंडकर हिंदीत काम मिळेनासं झाल्यानं लाइमलाइटपासून दूर असली तरीही २०१९ पासून राजकारणात ती सक्रीय होती.

रुपेरी पडद्यावर उर्मिलाचे दर्शन घडले नसले तरीही ती सोशल मीडियावर मात्र चाहत्यांच्या संपर्कात होती.

आता पुन्हा एकदा उर्मिला रसिकांचे मनोरंजनक करण्यासाठी सज्ज झाली आहे.

एका वेब सीरीजच्या माध्यमातून उर्मिला रसिकांच्या भेटीला येणार असल्याचं समजतंय.

वयाची चाळिशी ओलांडल्यानंतरदेखील उर्मिलाचा चार्म पुर्वीएवढाच कायम आहे.

वयाच्या ४२ व्या वर्षी उर्मिलाने 9 वर्षांनी लहान असलेला उद्योगपती व मॉडेल मोहसीन अख्तर मीर याच्यासोबत लग्नगाठ बांधली.

एकेकाळी उर्मिला यशाच्या शिखरावर होती.असे म्हणतात की, याच व्यक्तिमुळे उर्मिलाचे करिअर उद्धवस्त झाले.

ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ती व्यक्ती होती दिग्दर्शक राम गोपाल वर्मा.

उर्मिलाला सर्वाधिक लोकप्रियता मिळवून दिली ती राम गोपाल वर्मांच्या 'रंगीला' या सिनेमाने.

राम गोपाल वर्मांचे बॉलिवूडमधील इतर कोणत्याही दिग्दर्शकासोबत फारसे पटायचे नाही.

याचा फटका उर्मिलाला बसला. राम गोपाल वर्मांमुळे अन्य दिग्दर्शकांनी उर्मिलाचा फारसा विचार केला नाही.

याचा परिणाम म्हणजे, हळू हळू तिला काम मिळणे बंद झाले आणि उर्मिला दूर फेकली गेली.