Then and Now : इतक्या बदलल्या जुन्या काळातील या नट्या, आता दिसतात अशा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 04:42 PM2020-06-22T16:42:44+5:302020-06-22T16:52:02+5:30

बॉलिवूडच्या अनेक नट्यांनी एक काळ गाजवला. पण आताश: काळानुरूप त्यांच्या लूकमध्ये बराच बदल झाला आहे. इतका की, अनेकींना तुम्ही ओळखूही शकणार नाही.

आशा पारेख - बॉलिवूडचा एक काळ गाजवणा-या आशा पारेख यांनी चाहत्यांना वेड लावले. त्यांनी स्वबळावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. जगाच्या पाठीवर असंख्य चाहते निर्माण केलेत. पण ख-या आयुष्यात मात्र त्या कायम एकट्या राहिल्या. त्यांनी लग्न केले नाही. आज मात्र आशा पारेख बºयाच बदलल्या आहेत. 77 वर्षांच्या आशा इंडस्ट्रीत अ‍ॅक्टिव्ह नाहीत. पण अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्ये अधूनमधून त्यांचे दर्शन घडत असते.

राखी गुलजार - 70 आणि 80 च्या दशक गाजवणाºया अभिनेत्री राखी गुलजार यांनी अभिनयाला कधीच रामराम ठोकला. ग्लॅमरस लाईफ मागे सोडून राखी आपल्या व्यक्तिगत आयुष्यात आनंदी आहेत. वयाची सत्तरी ओलांडलेल्या राखी यांना आज प्रथम नजरेत कोणीही ओळखू शकणार नाही, इतक्या त्या बदलल्या आहेत.

वहीदा रहमान - प्यासा , साहेब,बिवी और गुलाम, गाइड , तिसरी कसम यांसारख्या अनेक सिनेमातून वहिदा रेहमान यांनी आपल्या सहजसुंदर अभिनयाने फॅन्सची मनं जिंकली.जुन्या जमान्यातच नाही तर दिल्ली-6, विश्वरुपम सारख्या सिनेमातही वहिदा रेहमान यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली. वहिदा रहमान इतक्या देखण्या होत्या की, त्यांचे सौंदर्य पाहून अनेक अभिनेते आपले संवाद विसरत, असे म्हणतात. आज वहिदांच्या लुकमध्ये फार काही खास बदल झाला नाही.

बबीता - बबीता यांचे फिल्मी करिअर फार मोठे नव्हते. पण तरीही बबीता यांनी मोठे नाव कमावले. बबीता हरी शिवदासानी असे त्यांचे पूर्ण नाव. चित्रपटात यशाची एक एक पायरी चढत असताना लोक त्यांना ओळखू लागलेत. पण यशाच्या शिखरावर असताना त्या रणधीर कपूर यांच्या प्रेमात पडल्या आणि या प्रेमासाठी त्यांनी फिल्मी करिअर सोडले. आपल्या सौंदर्यासाठी ओळखल्या जाणा-या बबीता यांनी 72 व्या वर्षांत पर्दापण केले आहे. आज बबीता यांना पाहिले तर तुम्ही ओळखूही शकणार नाही.

माला सिन्हा - माला सिन्हा यांनी धुल का फूल, बहुराणी, हिमालय की गोंद में यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या अभिनयासाठी त्यांना आजवर अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्या गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहेत. माला सिन्हा आता इतक्या बदलल्या आहेत की, त्यांना ओळखणे देखील कठीण झाले आहे. माला सिन्हा यांचे लग्न चिदंबर प्रसाद लोहानी यांच्यासोबत झाले होते. त्यांना प्रतिभा ही मुलगी असून तिने काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण तिला बॉलिवूडमध्ये यश मिळवता आले नाही. मुलीला बॉलिवूडमध्ये मिळालेल्या अपयशानंतर त्यांनी फिल्मी पार्टींमध्ये देखील हजेरी लावणे बंद केले.

वैजयंती माला - वैजयंती माला यांनी आपला एक काळ गाजवला. 83 वर्षांच्या वैजयंती माला यांच्या चेह-यावर आताश: वार्धक्याच्या खुणा स्पष्ट दिसतात. त्या ब-याच बदलल्या. मात्र त्यांची स्टाईल मात्र आजही तीच आहे.

मुमताज - तिच्या काळातील सर्वात महागडी अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी मुमताज़ आज त्यांना पाहिले तर कुणी ओळखू देखील शकणार नाही. त्या आता ७२ वर्षांच्या झाल्या आहेत.