२०२० मध्ये या वेबसिरिजना मिळाली लोकांची पसंती, तुम्ही पाहिल्यात का या वेबसिरिज?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 06:16 PM2020-12-18T18:16:08+5:302020-12-18T18:16:08+5:30

आर्या या वेबसिरिजद्वारे सुश्मिता सेनने वेबसिरिजच्या दुनियेत प्रवेश केला आहे.

प्रकाश झा यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि बॉबी देओलची मुख्य मुख्य भूमिका असलेल्या आश्रम या वेबसिरिजला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली.

'ब्रीद' Breathe च्या पहिल्या भागात आर माधवन झळकला होता. या सिरिजमध्ये अभिषेक बच्चनची मुख्य भूमिका आहे.

बंदिश बँडिडमध्ये नसिरुद्दीन शहा, अतुल कुलकर्णी यांच्या मुख्य भूमिका आहेत.

'स्पेशल ओप्स'मध्ये केके मेनन, रेवती पिल्लई और करण टैकर लीड रोलमध्ये आहेत.

जयदीप अहलावत, गुल पनाग आणि नीरज काबी यांची मुख्य भूमिका असलेल्या पाताल लोक या वेबसिरिजची तर चांगलीच चर्चा झाली होती. या वेबसिरिजची निर्मिती अनुष्का शर्माने केली आहे.

'स्कैम 1992: द हर्षद मेहता स्टोरी' मध्ये प्रतीक गांधी आणि श्रेया धनवंतरी मुख्य भूमिकेत आहेत.

'मिर्जापुर 2'ची प्रेक्षक कित्येक महिन्यांपासून वाट पाहात होते. या वेबसिरिजला प्रेक्षकांनी चांगली पसंती दर्शवली.