नॅशनल क्रश रश्मिका मंदानापासून ते विजय सेतुपतिपर्यंत, साऊथचे हे स्टार्स करणार आहेत बॉलिवूड डेब्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 03:25 PM2022-01-22T15:25:49+5:302022-01-22T15:36:32+5:30

South Stars Bollywood Debut: आज बॉलिवूडचे अनेक कलाकार साऊथच्या सिनेमांमध्ये दिसत आहेत. अशात आता साऊथचेही अनेक कलाकार बॉलिवूड सिनेमांमध्ये बघायला मिळणार आहेत.

South Stars Bollywood Debut: गेल्या काही वर्षात साऊथ इंडियन सिनेमांनी प्रेक्षकांच्या मनात मोठी जागा निर्माण केली आहे. आज बॉलिवूडचे निर्माता-दिग्दर्शक साऊथ इंडियन कलाकारांसोबत काम करण्यासाठी उत्सुक आहेत. बॉलिवूडमध्ये साऊथच्या अनेक सिनेमांचे रिमेक बघायला मिळत आहेत. आज बॉलिवूडचे अनेक कलाकार साऊथच्या सिनेमांमध्ये दिसत आहेत. अशात आता साऊथचेही अनेक कलाकार बॉलिवूड सिनेमांमध्ये बघायला मिळणार आहेत.

रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) - अल्लू अर्जूनच्या 'पुष्पा' सिनेमातील अभिनेत्री आणि नॅशनल क्रश असणारी रश्मिका मंदाना लवकरच सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'मिशन मजनू' सिनेमात दिसणार आहे. हा तिचा बॉलिवूड डेब्यू सिनेमा असणार आहे. रश्मिका सध्या साऊथ सिने इंडस्ट्रीतच नाही तर बॉलिवूडमध्येही चर्चेचा विषय आहे.

नयनतारा - साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील लेडी सुपरस्टार नयनतारा सुद्धा आपल्या बॉलिवूड डेब्यूसाठी पूर्णपणे तयार आहे. नयनतारा लवकरच एटली कुमारच्या आगामी सिनेमात शाहरूख खानसोबत दिसणार आहे.

राशि खन्ना - साऊथची लोकप्रिय अभिनेत्री राशि खन्ना धर्मा प्रॉडक्शनच्या 'योद्धा' सिनेमात सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे. राशि खन्नाचे फॅन्स तिच्या बॉलिवूड डेब्यूची आतुरतेने वाट बघत आहेत.

अदीवी सेष - साऊथमधील आणखी एक लोकप्रिय अभिनेता म्हणजे अदीवी शेष. तो 'मेजर' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. हा सिनेमा मुंबई हल्ल्यात शहीद झालेले भारतीय सेनेचे मेजर संदीप उन्नीकृष्णन यांचा बायोपिक आहे.

नागा चैतन्य - साऊथचे सुपरस्टार नागार्जुन यांचा मुलगा नागा चैतन्य लवकरच आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे.

शालिनी पांडे - साऊथची लोकप्रिय अभिनेत्री शालिनी पांडेही रणवीर सिंहच्या 'जयेशभाई जोरदार' सिनेमातून बॉलिवूड डेब्यू करणार आहे.

विजय सेतुपति (Vijay Sethupathi) - साऊथचा प्रसिद्ध अभिनेता विजय सेतुपति 'मेरी क्रिसमस' आणि 'मुंबईकर' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे.

कर्थी शिवकुमार - कर्थी शिवकुमार त्याच्या पहिल्या बॉलिवूड सिनेमात अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या सिनेमाचं नाव Ponniyin Selvan: I आहे आणि या सिनेमाचं बजेट ५०० कोटी असल्याचं बोललं जात आहे.