नवे सिनेमे, नवे चेहरे...! आता या 8 नव्या अभिनेत्रींच्या पदार्पणाची उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 03:44 PM2021-11-19T15:44:57+5:302021-11-19T15:52:09+5:30

येत्या काळात 8 नव्या अभिनेत्री बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री करणार आहेत. या बाला बी-टाऊनमध्ये किती गाजतात, हे कळेलच.. मात्र सध्या तरी या बालांची चर्चा मात्र जोरात आहे...

मिस वर्ल्डचा ताज शिरावर मिरवणारी मानुषी छिल्लर लवकरच ‘पृथ्वीराज’ या बिग बजेट सिनेमातून डेब्यू करतेय. पहिल्याच चित्रपटात तिला अक्षय कुमारसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. ‘पृथ्वीराज’ पाठोपाठ यशराजचा आणखी दोन चित्रपटात ती झळकणार आहे.

शर्वरी वाघ हिचं पदार्पण झालंय, असं म्हणायला हरकत नाही. होय, शर्वरीचा ‘बंटी और बबली 2’ हा सिनेमा आजच 19 नोव्हेंबरला प्रदर्शित झालायं. अर्थात ही तर सुरूवात आहे. शर्वरीचं नशीब या चित्रपटाच्या यशावर अवलंबून असणार आहे.

रश्मिका मंदाना ही साऊथची सुपरस्टार म्हणून ओळखली जाते. आता ती बॉलिवूडमध्ये येतेय. सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘मिशन मजनू’ या चित्रपटांत ती झळकणार आहे.

कतरिना कैफची क्रेझ आजही कायम आहे. पण आता तिला टक्कर द्यायला तिची लहान बहीण इसाबेल कैफ बॉलिवूडमध्ये येतेय. ‘टाइम टू डान्स’ या चित्रपटात ती सूरज पांचोलीसोबत दिसणार आहे. याशिवाय आयुष शर्मासोबत ‘क्वाथा’ आणि पुलकीत सम्राटसोबत ‘सुस्वागतम खुशामदीद’ या दोन चित्रपटातही तिची वर्णी लागली आहे.

म्हणायला ती यु-ट्यूब सेन्सेशन. पण आता ती बॉलिवूडच्या सिनेमात झळकणार आहे. होय, युट्यूबवर प्रचंड लोकप्रिय असलेली शर्ले सेटिया अलीकडे ‘मस्का’ या वेबफिल्ममध्ये त् झळकली. आता ‘निकम्मा’ या सिनेमाची मुख्य नायिका म्हणून ती मोठ्या पडद्यावर पर्दापण करतेय. या चित्रपटात अभिमन्यू दासानी हा तिचा हिरो असणार आहे.

कन्नड, तमिळ, तेलगू चित्रपटांत झळकलेली प्रणिता सुभाष ही काही महिन्यांपूर्वीच ‘हंगामा 2’ या चित्रपटात झळकली. आता प्रतीक्षा आहे ती तिच्या ‘भूज’ या सिनेमाची. यात ती अजय देवगणसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.

साऊथची बाला शालिनी पांडे हिचीही जबरदस्त क्रेझ आहे. शालिनी लवकरच रणवीर सिंगसोबत ‘जयेशभाई जोरदार’ चित्रपटात दिसणार आहे.

टीव्हीवरची लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक पलक तिवारीही लवकरच मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे.

Read in English