पेहचान कौन ? वाढत्या वजनामुळे अभिनेत्रीची झाली अशी अवस्था, ओळखणेही झाले कठिण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 12:29 PM2021-02-08T12:29:24+5:302021-02-08T12:39:03+5:30

1972 ते 1985 या काळात आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणा-या अभिनेत्री म्हणजे रिना रॉय, आपल्या बहारदार अभिनयाने त्यांनी रसिकांवर मोहिनी घातली.

७०च्या दशकात एक यशस्वी अभिनेत्री म्हणून रिना रॉयकडे पाहिलं गेलं. याच काळात अनेक अभिनेत्री यशशिखरावर होत्या.

आपल्या अदा आणि सौंदर्यानं त्यावेळच्या प्रस्थापित अभिनेत्रींना कडवी टक्कर दिली होती.

रिना यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमा दिले.'जानी दुश्मन', 'नागिन', 'कालीचरण', 'विश्वनाथ' असे अनेक सिनेमे केले.

विशेष म्हणझे रिना रॉय त्यांच्या फिल्मी करिअरपेक्षा त्यांच्या खासगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिल्या.

जेव्हा त्या करिअरच्या यशोशिखरावर होत्या, तेव्हा त्यांचे शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत अफेअर सुरु होते. अफेअरविषयी शत्रुघ्न यांच्या पत्नीला सर्वकाही माहिती असल्याचे बोलले जाते.

७ वर्ष या दोघांचे अफेरअ होते, मात्र या दोघांच्या नात्यानेही असा काही युटर्न घेतला की सा-यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.

जेव्हा रिना कामानिमित्त लंडन गेल्या होत्या. त्यावेळी शत्रुघ्न यांनी पूनमसोबत लग्न करून संसार थाटला.

रिना यांना या लग्नाविषयी अजिबात माहिती नव्हती, भारतात आल्यानंतर मात्र त्यांनी शत्रुघ्न यांच्याकडे उत्तरही मागितले.

मात्र या दोघांचे नाते संपुष्टात का आले, याचे उत्तर आजही कुणाकडे नाहीये.

शत्रुघ्न यांना रिना रॉयवर विश्वास नव्हता, जिच्यावर विश्वास नाहीये.अशा मुलीसोबत त्यांना लग्न करायचे नव्हते अशाही चर्चा रंगल्या होत्या.

लग्नानंतरही शत्रुघ्न रिना रॉय यांना भेटायचे असेही बोलले जायचे.