10 वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करतेय तनुश्री दत्ता, #meetoo अभियानामुळे आली होती चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2020 12:39 PM2020-11-11T12:39:15+5:302020-11-11T12:48:02+5:30

36 वर्षीय तनुश्रीने 'आशिक बनाया आपने', 'हॉर्न ओके प्लीज', 'ढोल' या चित्रपटांमध्ये काम केले. तिचा शेवटचा चित्रपट 10 वर्षांपूर्वी म्हणजे 2010 मध्ये आलेला 'अपार्टमेंट' हा होता.

2010 पासून चित्रपटांपासून दूर असलेली तनुश्री आता बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून तिने हा खुलासा केला आहे. तनुश्रीने इंस्टाग्रामवर तिच्या नवीन लूकचा फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिचे वजन पूर्वीपेक्षा खूप कमी दिसत आहे. तिने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये तिच्यातील कायापालट स्पष्टपणे पाहायला मिळत आहे.

तिच्या या नव्या अवताराची जोरदार चर्चा आहे. सोशल मीडियावरही ती सक्रिय असते तिचे वेगवेगळ्या अंदाजातील फोटो ती शेअर करत असते. तिने नुकतीच एका ब्युटी ब्रँडची जाहिरात शूट केली आहे.तिने यासाठी 15 किलो वजन कमी केले होते. चित्रपट आणि वेब सीरिजच्या काही चांगल्या ऑफर्स तिच्याकडे आहेत.

हिंदीसोबतच काही दाक्षिणात्या सिनेमांच्या तिच्याकडे ऑफर्स आहेत. मी गेल्या काही वर्षांपासून चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांमुळे सिनेसृष्टीपासून दूर होते. परंतु आता मी माझा निर्णय बदलला आहे. आता पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्याचा निर्णय मी घेतला आहे." अशा आशयाची पोस्ट तनुश्रीने शेअर केली आहे.

२००३ साली फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकल्यानंतर तनुश्रीने २००५ साली आशिक बनाया आपने सिनेमातून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. या सिनेमाला आणि तनुश्रीच्या सिनेमातील परफॉर्मन्सला रसिकांची दाद मिळाली.

यानंतर ती चॉकलेट, ढोल, रिस्क,स्पीड अशा विविध सिनेमातही झळकली. मात्र पहिल्या सिनेमातील यशाप्रमाणे तनुश्रीला या सिनेमांमध्ये यश मिळालं नाही. हे सिनेमा सपशेल आपटले. त्यामुळे तनुश्री हिंदी चित्रपटसृष्टीतून गायब झाली.

2010 साली रूपेरी पडद्यावर झळकलेल्या अपार्टमेंट सिनेमात तनुश्रीचं रसिकांना अखेरचं दर्शन झालं होतं. तनुश्रीने आजवर मोजकेच सिनेमा केले असले तरी ती कोट्यवधीच्या संपत्तीची मालकीण आहे. एका सिनेमात काम करण्यासाठी तनुश्री एक कोटी रुपये इतके गलेलठ्ठ मानधन घेते.

मॉडेलिंग आणि सिनेमा तिचं कमाईचं साधन असून यातून ती आपला उदरनिर्वाह चालवते. २००३ साली फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकल्यानंतर तनुश्रीने २००५ साली आशिक बनाया आपने सिनेमातून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते.

यानंतर ती चॉकलेट, ढोल, रिस्क,स्पीड अशा सिनेमातही झळकली. मात्र २०१० नंतर ती सिनेमांत दिसली नाही.तनुश्री दत्ता विरुद्ध नाना पाटेकर वाद चांगलाच पेटला होता.

अभिनेता नाना पाटेकर यांनी २००८ साली 'हॉर्न ओके प्लीज' या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान छेडछाड करण्याचा गंभीर आणि धक्कादायक आरोप तनुश्री दत्ताने केला होता.

कोरियोग्राफरला दूर सारत डान्स स्टेप्स कशा कराव्यात दाखवण्याचा अट्टाहास नाना करत होते असा धक्कादायक आरोपही तिने नाना पाटेकर यांच्यावर केला होता.

तब्बल 10 वर्षांनंतर तनुश्रीने हे प्रकरण समोर आणले होते. या आरोपांनंतर हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक मंडळींनी तनुश्रीची उघडपणे बाजू घेतली होती.