Tamannaah Bhatia: पिंक आउटफिटमध्ये तमन्ना भाटियाने केलं ग्लॅमरस फोटोशूट, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 05:21 PM2022-05-27T17:21:27+5:302022-05-27T17:21:27+5:30

साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया Tamannaah Bhatia) तिच्या सौंदर्य आणि ग्लॅमरस स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. तमन्नाने साऊथमधील एकापेक्षा जास्त हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

तमन्ना भाटिया गेल्या अनेक दिवसांपासून कान्स 2022 फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर धुमाकूळ घालत होता. (फोटो: इंस्टाग्राम)

आता तमन्ना मायदेशात परतली आहे आणि अभिनेत्रीने करण जोहरच्या बर्थ डे पार्टीत चांगलीच रंगत आणली.फोटो: इंस्टाग्राम)

करण जोहरच्या बर्थ डे पार्टीत तमन्ना भाटिया पिंक कलरच्या आउटफिटमध्ये पोज देताना दिसत आहे.(फोटो: इंस्टाग्राम)

तमन्ना भाटियाचे हे फोटो करण जोहरच्या बर्थडे पार्टी लूकमधील आहेत. ज्यामध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

तमन्ना भाटियाने साऊथमध्येच नाही तर बॉलिवूड इंडस्ट्रीतही आपलं नशीब आजमावला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022 मधील तिच्या सर्व लूकसाठी तमन्ना बरीच चर्चेत राहिली. (फोटो: इंस्टाग्राम)