तैमुर बॉलिवूडमध्ये करणार का पदार्पण?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 06:54 PM2019-04-18T18:54:51+5:302019-04-18T19:01:56+5:30

सैफ अली खान आणि करिना कपूर इतकाच त्यांचा मुलगा तैमुर प्रसिद्ध आहे

तैमुर हा मीडियाचा प्रचंड लाडका असून त्याला कॅमेऱ्यात टिपण्यासाठी नेहमीच फोटोग्राफर्सचे कॅमेरे सरसावलेले असतात.

तैमुरदेखील न कंटाळता फोटोग्राफर्सना पोझ देत असतो.

लोकांचा लाडका तैमुर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे.

तैमुर प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकरच्या चित्रपटात झळकणार असल्याचे म्हटले जात आहे.

तैमुर माझ्या चित्रपटात काम करत आहे ही केवळ एक अफवा असल्याचे मधुरने स्पष्ट केले आहे.

तैमुरची आई करिना कपूरने मधुरच्या हिरोईन या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती.

टॅग्स :तैमुरTaimur