रशियाच्या रस्त्यांवर तापसी पन्नूचा स्वॅग; एकदा पाहाल, तर पाहातच राहाल असे सुंदर फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 01:32 PM2021-06-22T13:32:36+5:302021-06-22T13:49:26+5:30

Taapsee Pannu : अभिनेत्री तापसी पन्नू सध्या काय करतेय, कुठे आहे तर दूर रशियात. होय, तापसी रशियात ट्रिप एन्जॉय करतेय.

अभिनेत्री तापसी पन्नू सध्या काय करतेय, कुठे आहे तर दूर रशियात. होय, तापसी रशियात ट्रिप एन्जॉय करतेय.

बहिण शगुनसोबत तापसी रशियात धम्माल मस्ती करतेय. सोशल मीडियावर या ट्रिपचे अनेक फोटो तिने शेअर केले आहेत.

रशियाच्या रस्त्यावरचे तिने हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

कॉटनची साडी आणि पायात शूज घालून तिच्या एका फोटोने तर सर्वांचे लक्ष वेधून घेतलेय. या फोटोतील तिचा स्वॅग बघण्यासारखा आहे.

कधी रशियातील रस्त्यावर सायकल चालवताना तर कधी रशियातील कॉफी टपरीवर कॉफीची मजा लुटतानाचे अनेक फोटो तापसीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोत रशियातील ‘टपरी’वरची कॉफी एन्जॉय करतेय.

या फोटोत तापसी निवांत बसून आइस्क्रिमचा आस्वाद घेतेय.

या फोटोत मास्कोच्या रस्त्यावर तापसी स्केट सायकलिंगचा आनंद घेताना दिसतेय.

या फोटोत तापसी बहिणीसोबत दिसतेय. तापसीच्या या फोटोला अनेक चाहत्यांसोबतच सेलिब्रिटींनी देखील पसंती दिलीय.

तापसी लवकरच ‘हसीन दिलरुबा’ या नेटफ्लिक्सवर रिलीज होणा-या सिनेमात झळकणार आहे.

‘हसीन दिलरुबा’ या सिनेमात तापसीसोबतच अभिनेता विक्रांत मेस्सी आणि हर्षवर्धन रामे मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

Read in English