पाहा, अभिनेत्री श्वेता बसूचा वेडिंग अल्बम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2018 03:28 PM2018-12-16T15:28:29+5:302018-12-16T15:32:36+5:30

‘मकडी’ फेम अभिनेत्री श्वेता बसू प्रसाद ही नुकतीच बॉयफ्रेन्ड रोहित मित्तलसोबत लग्नबेडीत अडकली. तिच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत.

श्वेता व रोहित यांनी बंगाली पद्धतीने लग्न केले. श्वेता सुमारे चार वर्षांपासून रोहितला डेट करत होती. दोन वर्षांपासून ते लिव्ह इनमध्ये राहत होते.

लग्नाचे सगळे विधी बंगाली पद्धतीने झाले. दोन्ही कुटुंबाचे नातेवाईक आणि जवळचे मित्र या लग्नात सहभागी झालेत.

लग्नाचे काही फोटो स्वत: श्वेताने तिच्या सोशल अकाऊंटवर शेअर केलेत. बंगाली वधूच्या रूपात ती अतिशय सुंदर दिसतेय.

लग्नाच्या आठवडाभरानंतर श्वेता व रोहितचे जंगी रिसेप्शन होईल.

याचवर्षी जूनमध्ये श्वेता व रोहित यांनी साखरपुडा केला होता.

२००२ मध्ये ‘मकडी’ या चित्रपटात श्वेता बालकलाकार म्हणून दिसली होती. यानंतर इक्बाल, वाह, लाईफ तो ऐसी, डरना जरूरी है अशा अनेक चित्रपटांत ती झळकली.