sushant singh rajput suicide ankita lokhande hasnt stopped crying after 14 days
In Pics: 14 दिवसानंतरही अंकिता लोखंडेचे अश्रू थांबेना, सुशांतची घ्यायची आईसारखी काळजी By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 03:42 PM2020-06-28T15:42:01+5:302020-06-28T15:51:34+5:30Join usJoin usNext सुशांतवर जीवापाड प्रेम करायची अंकिता.. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येचा त्याची पूर्वाश्रमीची गर्लफ्रेन्ड अंकिता लोखंडेला जबर धक्का बसला आहे. सुशांत जाऊन आज 14 दिवस झालेत पण तिच्या डोळ्यांतले अश्रू थांबलेले नाहीत. अंकिता गेल्या 14 दिवसांपासून सतत रडते आहे. क्षणभरासाठीही तिचे अश्रू थांबलेले नाही, असा खुलासा अंकिताचा मित्र संदीप सिंगने केला आहे. फोनवर बोलतानाही ती आपले अश्रू रोखू शकत नाहीये. अंकिता प्रचंड इमोशनल आहे, याचमुळे सुशांतच्या मृत्यूच्या धक्क्यातून ती सावरू शकलेली नाही. अंकिता सुशांतवर जीवापाड प्रेम करायची. त्याची अगदी आईसारखी काळजी घ्यायची, असे संदीप सिंगने सांगितले. सुशांतच्या आवडीनुसार, तिने तिचे घर सजवले होते. त्याच्या आवडीच्या जेवणापासून तर त्याच्या गरजेच्या प्रत्येक वस्तूची काळजी ती घ्यायची. सुशांतला वाचनाची आवड होती़ अंकिता कुठेही गेली तरी सुशांतसाठी पुस्तके खरेदी करायची. सुशांत व अंकिता जवळपास सहा वर्षे रिलेशनशिपमध्ये होते.पवित्र रिश्ता या मालिकेच्या सेटवर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते.दोघेही लग्न करणार असे वाटत असतानाच अचानक त्यांचे ब्रेकअप झाले होते.टॅग्स :अंकिता लोखंडेसुशांत सिंग रजपूतAnkita lokhandeSushant Singh Rajput