2019 मध्ये बर्थडेला सुशांत साराला करणार होता प्रपोज? मॅनेजरने केला अनेक गोष्टींचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 01:00 PM2020-09-05T13:00:41+5:302020-09-05T13:27:08+5:30

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुशांत आणि सारा यांच्यात 'केदारनाथ' शूटींग दरम्यान जवळीकता वाढली होती. आता सुशांतच्या फार्महाउसचा मॅनेजर रईस जो लोणावळातील फार्महाउसचा केअरटेकर आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या केसमध्ये दररोज नवीन खुलासे होत आहेत. अनेक लोक समोर येऊन सुशांतबाबत वेगवेगळे खुलासे करत आहेत. यात सैफ अली खानची मुलगी सारा अली खानच्या अफेअरची चर्चाही मीडियात होऊ लागली आहे. अशात आता सुशांतच्या फार्महाउसच्या मॅनेजरने खुलासा केला आहे की, सुशांत साराला बर्थडेच्या दिवशी प्रपोज करणार होता.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुशांत आणि सारा यांच्यात 'केदारनाथ' शूटींग दरम्यान जवळीकता वाढली होती. आता आता सुशांतच्या फार्महाउसचा मॅनेजर रईस जो लोणावळातील फार्महाउसचा केअरटेकर आहे. त्याने एका न्यूज एजन्सीला सांगितले की, त्यांचं लग्न काय प्लॅनिंग होतं याबाबत त्याला काही माहीत नाही.

रईसने सांगितले की, सारा २०१८ पर्यंत फार्महाउसवर येत होती. पण जानेवारी २०१९ नंतर ती पुन्हा दिसली नाही. मॅनेजर म्हणाला की, 'साराने सुशांतसोबत २०१८ पासून येणं सुरू केलं होतं. ते जेव्हाही फार्महाउसवर येत होते तेव्हा ३ ते ४ दिवस इथेच थांबत होते'.

मॅनेजरने सांगितले की, 'डिसेंबर २०१८ मध्ये थायलॅंड ट्रिपवरून परत आल्यावर सुशांत आणि सारा एअरपोर्टवरून थेट फार्महाउसवर आले होते. ते रात्री १० ते १० दरम्यान पोहोचले होते. त्यांच्यासोबत आणखी एक मित्र होता'.

रईसने साराचं कौतुक करताना सांगितले की, 'सारा मॅमचं वागणं फार चांगलं आहे. ती एका अभिनेत्रीसारखी वागत नाही. ती खूप साधी आहे. ती तिथे काम करणाऱ्या महिलेला मावशी म्हणून हाक मारायची. तसेच सारा रईसला भाई म्हणून हाक मारायची. ज्याप्रमाणे सुशांत आपल्या स्टाफचा सन्मान करायची तसा ती करायची'.

मॅनेजरने पुढे सांगितले की, 'त्याने ऐकलं होतं की, सुशांत साराला त्याच्या बर्थडेच्या दिवशी २१ जानेवारी २०१९ ला प्रपोज करणार होता. पण त्याला हे माहीत नव्हतं की, सुशांत साराला लग्नासाठी प्रपोज करणार होता की नाही'. रईसने सुशांतचा एक मित्र अब्बासचं बोलणं आठवत सांगितलं की, 'मला आठवतं अब्बास भाईने सुशांतचा बर्थडेला मला दमन ट्रिपसाठी बॅग पॅक करण्यासाठी सांगितलं होतं'.

'ही माझी नेहमीच जबाबदारी होती की, बाहेर कुठे जायचं असेल तर बॅग पॅक करायची. जसे की, टेलिस्कोप, म्युझिक सिस्टीम आणि गिटार. सुशांत बाहेर जाताना या गोष्टी घेऊन जायचा. सुशांत दमन ट्रिपवर साराला प्रपोज करणार होता. त्यासोबत तो तिला गिफ्टही देणार होता. पण ही ट्रिप यशस्वी ठरली नाही. त्यानंतर केरळ ट्रिप प्लॅन केली होती. पण ती सुद्धा कॅन्सल झाली. नंतर २०१९ मध्ये दोघांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर ती कधीच फार्महाउसवर आली नाही'.

रईसने हेही सांगितले की, 'सुशांत या वर्षाच्या सुरूवातीला मार्चपासून दोन ते तीन महिने फार्महाउसवर थांबणार होता. पण तसं झालं नाही. तो इथे येऊन ऑर्गॅनिक फार्मिंग करण्याच्या विचारात होता. पण हाही प्लॅन कॅन्सल झाला'.

रईस म्हणाला की 'त्याने सुशांतसारखा बॉस आजपर्यंत आयुष्यात पाहिला नाही. तो स्टाफसोबत क्रिकेट खेळत होता आणि स्टाफ त्याला जे काही बनवून देत होते ते तो आरामात खात होता. सर्वांसोबत तो एका परिवारासारखा वागत होता. मला अजूनही विश्वास बसत नाहीये की, सुशांत सर आता या जगात नाही'.

Read in English