अभिनेता बनल्यावर १७ वर्षांनंतर पाटण्याला गेला होता सुशांत सिंग राजपूत; असे केले होते जंगी स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 05:53 PM2020-06-14T17:53:28+5:302020-06-14T17:57:57+5:30

अभिनेता बनल्यावर १७ वर्षांनंतर पाटण्याला गेला होता सुशांत सिंग राजपूत

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली आणि बॉलिवूड सुन्न झाले. टीव्ही ते बॉलिवूड असा यशस्वी प्रवास करणारा सुशांतने आत्महत्या का करावी? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला. अभिनेता बनल्यावर १७ वर्षांनी त्याच्या घरी पाटण्याला गेला होता. तेव्हा त्याचे अत्यंत जंगी स्वागत करण्यात आले होते. या फोटोंवरून कळते की, त्याचे कुटुंबीय त्याच्या येण्याने किती आनंदित होते ते...

नीतेश तिवारी यांच्या ‘छिछोरे’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तो पाटणा येथे त्याच्या घरी गेला. त्यावेळीचे काही फोटो समोर आले आहेत. सुशांतने शुटिंगमधून वेळ काढून बिहारच्या खगडिया या जिल्ह्यातील बोरने या गावी गेला होता. हे त्याच्या वडिलांचे मूळ गाव आहे. तो त्याच्या अ‍ॅक्टिंग करिअर नंतर १७ वर्षांनंतर तिथे गेला होता.

सुशांतने तिथे जाऊन मुंडन संस्कार देखील करून घेतला होता. संपूर्ण मुंडन करण्यापेक्षा त्याने काही केस कापले होते, परंतु विधी पूर्ण केला होता. तो त्यासाठी बोरने येथील भगवती मंदिरमध्ये पोहोचला होता.

सुशांतच्या आईने देवाकडे सुशांतच्या उत्तम स्वास्थ्यासाठी नवस केला होता. तो जेव्हा यशस्वी कलाकार होईल तेव्हा त्याचे मातेच्या मंदिरात मुंडन विधी करून घ्यायचा. आईच्या या इच्छेसाठी तो गावी गेला होता.

सुशांत म्हणायचा की,‘माझे आईवरही प्रेम आहे आणि देवी माँवरही प्रेम आहे. म्हणून मी १७ वर्षांनंतर तो नवस फेडण्यासाठी आलो आहे.’