तारा सुतारियाचा ग्लॅमरस लूक तुम्हाला करेल घायाळ, फॅन्स तिच्या अदांवर झालेत फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 06:36 PM2020-12-29T18:36:59+5:302020-12-29T18:46:19+5:30

सोशल मीडियावर अभिनेत्री तारा सुतारियाचा बोलबोला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. आपली स्टाईल आणि फॅशनबाबतही तितकीच सजग आहे. कोणत्या कार्यक्रमात कशी स्टाईल आणि फॅशन असावी हे ती उत्तमरित्या जाणते. पुन्हा एकदा तिच्या मालदीव्हज व्हॅकेशनमुळे ती चर्चेत आली आहे.

विशेष म्हणजे कोणतीही स्टाईल आणि फॅशन तिच्या सौंदर्याला चारचाँद लावते.

नेहमीच तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकमुळे सोशल मीडियावरही रसिकांची मनं जिंकण्यात ती यशस्वी ठरत आहे.

अगदी त्याचप्रमाणे तिचा हा अंदाज रसिकांनाही नक्कीच पसंत पडल्याशिवाय राहणार नाही.

याआधीही विविध फोटोशूटमधून आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना घायाळ केलं होतं.

समुद्र किनारी ताराचा हा हॉट लूक पाहून सोशल मिडियावर कमेंटचा वर्षाव सुरू आहे.

मालदीव्हज व्हॅकेशन दरम्यानचा तिचा हा फोटो आहे.

या फोटोत तिचा अंदाज जितका ग्लॅमरस, रॉकिंग आहे तितकीच त्यात नजाकतही असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे ताराचा हा फोटो काहीसा वेगळा ठरतो.

तारा अल्पवधीतच साऱ्यांची लाडकी बनली होती. आपल्या हॉट लूकने सोशल मीडियावर धुमाकुळ घातल्याचे पाहायला मिळते.

तारा आगामी 'हीरोपंती 2' मध्ये दिसणार आहे. आधी सारा अली खान सिनेमात काम करणार होती.

मात्र ड्रग्स प्रकरणात साराचे नाव आल्यानंतर तिला या सिनेमातून काढून टाकण्यात आले होते.