Ajay Devgn and Kajol: असं आहे अजय देवगण आणि काजोलचं आलिशान घर, पाहून डोळे विस्फारतील

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 11:45 PM2022-04-30T23:45:06+5:302022-04-30T23:48:24+5:30

Ajay Devgn and Kajol Home: अजय देवगन आणि काजोल या बॉलीवूडमधील प्रसिद्ध कपलच्या लग्नाला २३ वर्षे होणार आहेत. आज आपण पाहुयात मुंबईतील त्यांच्या शिवशक्ती आलिशान घराचे काही खास फोटो.

अजय देवगन आणि काजोल या बॉलीवूडमधील प्रसिद्ध कपलच्या लग्नाला २३ वर्षे होणार आहेत. आज आपण पाहुयात मुंबईतील त्यांच्या शिवशक्ती आलिशान घराचे काही खास फोटो.

घराच्या इंट्रेंसमध्ये पांढऱ्या रंगाचा सर्वाधिक वापर करण्यात आला आहे. खिडक्यांवर लाकडांचं बारीक काम करण्यात आसं आहे. तसेच खिडक्यांवर मिरर्ड ग्लास लावण्यात आले आहेत.

घरातील ड्रॉईंग रूम खूप आरामदायक आणि अॅडजस्टेबल आहे. त्यामध्ये एक मोठी ओपन खिडकी आहे. या खिडकीबाहेरील हिरवळ पाहून तुम्हाला रिलॅक्स वाटू शकेल. या फोटोत तुम्ही अजय देवगनला आराम करताना पाहू शकता.

अजय देवगन आणि काजोलच्या बंगल्याच्या बॅकयार्डच्या भिंती सुंदर दगडांपासून बनवल्या आहेत. घडाचे वुडन फ्लोअर्स खूप नॅचरल आणि डिसेंट लूक देतात.

ब्राऊन कुशन्स आणि एलोवेटिक मोठं कपाट आणि सोबत एक स्टायलिश ड्रेसअप एरियासुद्धा आहे. याशिवाय त्यांच्या घराच्या पायऱ्याही सुंदर आहेत. काजोलच्या अनेक फोटोंच्या बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला या स्टेअरकेस दिसतील.

लिव्हिंग रूममध्ये व्हाईट सोफा सेट, पडदे आणि भिंती याला अधिकच आलिशान बनवतात. त्याच्या अगदी उलट बेडरूममध्ये काळ्या रंगाचे दिवाण आणि काळ्या रंगाचे दरवाजे आहेत. याशिवाय या घरात एक जिमही आहे.