बोल्डनेसची मर्यादापार! ब्रालेटमध्ये फोटोशूट केल्यामुळे सोनम कपूर ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 05:46 PM2021-11-24T17:46:51+5:302021-11-24T17:52:51+5:30

Sonam kapoor: सोनमने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. या फोटोमध्ये तिने एक हेवी नेकपीस घातला आहे.

अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) यांची लाडकी लेक सोनम कपूर (Sonam Kapoor) सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. (फोटो सौजन्य: सोनम कपूर फेसबुक पेज)

चित्रपटांपेक्षा सोनम तिच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत असते. यात खासकरुन तिच्या फॅशनसेन्सची चर्चा रंगत असते.

सोनम कोणतीही नवीन फॅशन सहज आणि सुंदररित्या कॅरी करते. त्यामुळेच आज ती बॉलिवूडची फॅशनिस्टा म्हणून ओळखली जाते.

सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असलेल्या सोनमने अलिकडेच एक नवीन फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटचे काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

दरवेळी आपल्या फॅशनसेन्समुळे चाहत्यांची वाहवाह मिळवणारी सोनम यावेळी मात्र ट्रोल झाली आहे.

अलिकडेच सोनमने इन्स्टाग्रामवर ब्रालेटमधील फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये तिने सुंदर मेकअप केला असला तरीदेखील तिचे कपडे पाहून तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.

सोनमने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. या फोटोमध्ये तिने एक हेवी नेकपीस घातला आहे. परंतु, तिचा ड्रेस नेटकऱ्यांना पटला नाही.

अनेकांनी सोनमच्या पोस्टवर कमेंट करुन तिला ट्रोल केलं आहे. 'नक्की काय दाखवायचा प्रयत्न करतेस', असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर, 'काट्यासारखं हे गळ्यात काय घातलंय', असं अन्य एका नेटकऱ्याने विचारलं आहे.

दरम्यान, सध्या सोनम तिच्या आगामी चित्रपटामध्ये व्यस्त आहे. लवकरच ती एका कोरियन चित्रपटाच्या रिमेकमध्ये झळकणार आहे. 'ब्लाइंड' असं या चित्रपटाचं नाव आहे.