एखाद्या राजवाड्याप्रमाणे आलिशान आहे सोनम कपूरचे घर, पाहा तिच्या महालाचे हे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 08:00 AM2020-05-17T08:00:00+5:302020-05-17T08:00:02+5:30

सोनम कपूर पती आनंद अहुजासोबत दिल्लीतील आपल्या सासरी आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे सोनम आणि आनंद दोघेही दिल्लीत आहेत.

सोनमचे दिल्लीतील घर एखाद्या राजवाड्याप्रमाणे आहे.

सोनम सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. ती तिचे अनेक फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिने नुकतेच तिच्या दिल्लीच्या घरातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

हे फोटो पाहून सोनमचे घर किती प्रशस्त आणि सुंदर आहे याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

सोनमने तिच्या बेडरूममधील एक फोटो पोस्ट केला असून तिचे बेडरूम खूपच छान आहे. यासोबतच क्वांरंटाईनमधील काही फोटो... असे तिने कॅप्शन दिले आहे.

सोनमने लिव्हिंग रूम, स्टडी रूम, किचन, गार्डनमधील देखील फोटो पोस्ट केले आहेत.

सोनम कपूर सध्या तिच्या कुटुंबियांसाठी जेवण देखील बनवत आहे. तिने तिचे किचनमधील काही फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

सोनमच्या घराचे गार्डन देखील खूप मोठे आहे.

सोनमच्या घराचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

सोनम कपूर आणि आनंदकडे खूप सारे शूज असून त्यांना दोघांनाही शूज कलेक्शन करायला आवडते.