सेलिब्रिटींचा बाप्पा! 'या' कलाकारांच्या घरी दरवर्षी होतं गणरायाचं आगमन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 08:30 AM2021-09-10T08:30:00+5:302021-09-10T08:30:02+5:30

Ganesh Utsav 2021: गणरायाच्या आगमनाची वाट सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सारेच जण पाहत असतात. यात कलाविश्वात असे काही सेलिब्रिटी आहेत जे वर्षानुवर्षे बाप्पाची सेवा करतायेत.

गणेशोत्सव म्हटला की सगळीकडे आनंदाचं आणि चैतन्याचं वातावरण पसरुन जातं. त्यामुळेच गणरायाच्या आगमनाची वाट सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सारेच जण पाहत असतात. यात कलाविश्वात असे काही सेलिब्रिटी आहेत जे वर्षानुवर्षे बाप्पाची सेवा करतायेत. त्यामुळे हे सेलिब्रिटी कोणते ते पाहुयात. ( फोटो सौजन्य : सर्व फोटो सेलिब्रिटींचे इन्स्टाग्राम/ सोशल मीडिया)

दरवर्षी अभिनेत्री सोनाली बेंद्रे पारंपरिक पद्धतीने गणरायाची पूजा करते

श्रद्धा कपूर - अभिनेत्री श्रद्धा कपूर हिच्या घरीदेखील गेल्या कित्येक वर्षांपासून बाप्पाचं आगमन होताना दिसतं.

संजय दत्त - अभिनेता संजय दत्तकडेदेखील गणरायाची स्थापना केली जाते.

बाप्पासोबत दिया मिर्झाने शेअर केलेला खास फोटो

तुषार कपूर - अभिनेता तुषार कपूर याच्या घरीदेखील दरवर्षी बाप्पाची स्थापना होते. या काळात तुषारच्या घरी संपूर्ण कपूर कुटुंब एकत्र येतं आणि हा उत्सव आनंदात साजरा करतात.

राजकुमार राव - अभिनेता राजकुमार राव काही वर्षांपासून गणरायाची स्थापना करत आहे. विशेष म्हणजे त्याच्या घरी इको फ्रेंडली गणरायाची पूजा केली जाते. कणिक आणि हळद वापरुन तो घरीच गणपतीची मुर्ती घडवतो.

सलमान खान- अभिनेता सलमान खान यांच्या घरच्या बाप्पाविषयी साऱ्यांनाच ठाऊक आहे. दरवर्षी सलमान खान गाजतवाजत बाप्पाचं आगमन आणि विसर्जन करत असतो.

शिल्पा शेट्टी - अभिनेत्री शिल्पा शेट्टी दरवर्षी गणपतीची प्राणप्रतिष्ठा करते. गेल्या कित्येक वर्षांपासून तिच्याकडे बाप्पाचं आगमन होत आहे.

विवेक ओबेरॉय - अभिनेता विवेक ओबेरॉयने २००७ पासून घरी गणपती बाप्पाची स्थापना करण्यास सुरुवात केली. या दिवशी तो घरी एक लहानशी पुजादेखील ठेवतो. शूटआऊट अॅट वडाला या चित्रपटापूर्वी विवेकचे अनेक चित्रपट अपयशी ठरले होते. मात्र २००७ मध्ये बाप्पाची घर स्थापना केल्यापासून त्याला करिअरमध्ये यश मिळालं असं तो म्हणतो.

नील नितीन मुकेश - अभिनेता नील नितीन मुकेश याच्याही घरी दरवर्षी गणरायाचं आगमन होतं. यावेळी त्याचं संपूर्ण कुटुंब बाप्पाची सेवा करतं.

राणी मुखर्जी - अभिनेत्री राणी मुखर्जी हिच्याकडे गेल्या १३-१४ वर्षांपासून गणरायाचं आगमन होतं. राणीची गणपतीवर अमाप श्रद्धा असून दरवर्षी ती मोठ्या थाटात गणेशोत्सव साजरा करते.

Read in English