ही ‘जन्नत गर्ल’ काम नसतानाही करतेय लाखोंची कमाई, बॉलिवूडमधून कधीच झाली बाद!

Published: May 16, 2021 07:03 PM2021-05-16T19:03:30+5:302021-05-16T19:13:56+5:30

इमरान हाश्मीच्या ‘जन्नत’ या चित्रपटातील हिरोईन आठवते? आम्ही बोलतोय ते अभिनेत्री सोनल चौहानबद्दल. आज तिचा वाढदिवस.

इमरान हाश्मीच्या ‘जन्नत’ या चित्रपटातील हिरोईन आठवते? आम्ही बोलतोय ते अभिनेत्री सोनल चौहानबद्दल. आज तिचा वाढदिवस.

सोनल चौहानचा जन्म 16 मे, 1985 साली न्यू दिल्लीत झाला होता. तिने दिल्ली युनिव्हर्सिटीतील गार्गी कॉलेजमधील फिलोसॉफी आॅनर्समध्ये डिग्री प्राप्त केली.

सोनलचा जन्म मणिपूरमधील एक राजघरात झाला आहे. सध्या ती लंडनमध्ये राहात असून मॉडलिंग करतेय.

‘जन्नत’मधून सोनलने बॉलिवूड डेब्यू केला़ पहिलाच सिनेमा हिट झाला. पण सोनलच्या करिअरला त्याचा फार काही फायदा झाला नाही. अचानक ती बॉलिवूडमधून बाद झाली.

बु्ड्ढा होगा तेरा बापा, 3 जी या सिनेमात तिने काम केले. पण हे सिनेमे आपटले आणि सोनलने साऊथकडे मोर्चा वळवला.

चित्रपटांमध्ये सोनलला अपयश मिळालं असलं तरी मॉडलिंगमध्ये मात्र सध्या ती यशाच्या शिखरावर आहे.

चित्रपटांपेक्षा सोनलच्या रिलेशनशिपमुळेच अधिक चर्चेत राहिली. नील नितीन मुकेश व सिद्धार्थ माल्यासोबत तिचे नाव जोडले गेले. इतकेच नाही तर सलमानचा भाऊ अरबाज खानसोबतही तिच्या रिलेशनशिपची चर्चा रंगली होती.

मध्यंतरी भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यु दासानी याच्यासोबतही तिच्या रिलेशनशिपच्या चर्चा होत्या.

सोनल चौहानचा एक फॅन आहे. तो तिला नियमित हजारोच्या संख्येने गुलाब पाठवतो. या फॅनचे नाव अद्यापही सोनलला माहित नाही.

सोनल चौहान सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. तिचे इंस्टाग्रामवर 3.2 मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!