सोशल मीडियावर ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते सोनाक्षी सिन्हा, म्हणाली - मैं जान गई हूं कि वो कौन लोग हैं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 11:27 AM2021-03-22T11:27:09+5:302021-03-22T12:33:22+5:30

सोनाक्षी सिन्हा चित्रपटांसोबतच सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. सोनाक्षी बॉलिवूडमधील त्या कलाकारांपैकी एक आहे जी सोशल मीडियावर सतत ट्रोल होत असते. (Photo Instagram)

सोनाक्षीला सोशल मीडिया तिच्या फोटो आणि पोस्टसाठी बर्‍याचदा ट्रोल केले जाते. ट्रोलिंगमुळे सोनाक्षी अस्वस्थ व्हायची, पण आता मात्र ती ट्रोलर्सना चोख प्रतिउत्तर द्यायला ती शिकली आहे. (Photo Instagram)

सोनाक्षी म्हणाली, आधी मी प्रत्येक ट्रोलिंगला उत्तर द्यायचे. तिला प्रत्येक गोष्टीचा वाईट पटकन वाटत आणि ती त्यावर स्पष्टीकरण द्यायची. (Photo Instagram)

आता तिचा विश्वास आहे की तिने ट्रॉलर्सशी डील करण्याचा मार्ग बदलला आहे. आता सोनाक्षीला समजले आहे की हे ट्रॉल्स फोनच्या मागून अश्लील कमेंट लिहिणारे भित्रे लोक असतात. (Photo Instagram)

एका मुलाखतीत सोनाक्षीने सांगितले की, 'ते फक्त फोनवर बसून नकारात्मकता पसरवत असतात. मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही. मला माझ्या चाहत्यांकडून खूप पाठिंबा मिळाला आणि ते माझ्यासाठी पुरेसे आहे. (Photo Instagram)

'पूर्वी मला अशा ट्रोलिंगमुळे खूप त्रास व्हायचा, परंतु आता मी अशा स्टेजवर पोहोचलो आहे जिथे मला काही फरक पडत नाही. आता मी पुढे जायला शिकलो आहे '. (Photo Instagram)

वाढलेल्या वजनामुळे सुरुवातीच्या काळात तिला बरीच टीकाही सहन करावी लागली. पण सोनाक्षीने हार मानली नाही. टीकेकडे लक्ष न देता ती स्वत:वर काम करत राहिली. (Photo Instagram)

सोनाक्षी सिन्हाने करिअरची सुरूवात कॉश्च्युम डिझायनर म्हणून केली होती. (Photo Instagram)

सोनाक्षी सिन्हाचे इंस्टाग्रामवर १९ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत. (Photo Instagram)